Electric Tractor : शेतकऱ्यांसाठी लाँच झाला Electric Tractor ; सिंगल चार्जवर 8 तास काम करणार

Electric Tractor AutoNxt X45
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात मागील काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी चांगलीच वाढली आहे. इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कार तर आपण बघितली असेलच. पण आता मार्केट मध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor) सुद्धा लाँच झाला आहे. AutoNxt X45 असं या नव्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे नाव असून हा देशातील पहिलाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असल्याचे बोललं जात आहे. या ट्रॅक्टरची खास बाब म्हणजे अवघे ३ तास फुल्ल चार्ज केल्यानंतर हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तब्बल ८ तास चालतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचण्यास मदत होणार आहे. आज आपण या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे खास फीचर्स जाणून घेणार आहोत.

35 KWHr क्षमतेचा बॅटरी पॅक- Electric Tractor

AutoNxt या कंपनीने देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर AutoNxt X45 बाजारात आणला असून या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सुरुवातीची किंमत 15.00 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, त्यात इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदानाचा समावेश नाही. सबसिडी ही राज्यानुसार वेगवेगळी असेल. कंपनीचा दावा आहे कि, हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (Electric Tractor)शेतीचा खर्च कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कंपनीने या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये 32 KW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे जी जास्तीत जास्त 45 HP पॉवर जनरेट करते. यात 35 KWHr क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जवर सुमारे 8 एकर शेतजमिनीत 8 तास काम करू शकतो. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या बॅटरीचे लाइफ सायकल 3000 आहे. म्हणजे त्याची बॅटरी साधारण 8 ते 10 वर्षे सहज टिकू शकते. परंतु हे सर्व ट्रॅक्टरवर असणारा लोड, त्याचा वापर यावर अवलंबून असेल.

10-15 टन लोड सहन करू शकतो-

हा ट्रॅक्टर चार्ज करण्यासाठी कंपनीने २ पर्याय दिले आहेत. घरगुती सॉकेट (15A) ला जोडून ते सहजपणे चार्ज केले जाऊ शकते. जर तुम्ही सिंगल फेजवर चार्ज केल्यास हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अंदाजे 6 तास लागतील तर थ्री फेजवर चार्ज करण्यासाठी केवळ 3 तासांचा वेळ लागेल. AutoNxt X45 हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 10-15 टन लोड सहन करू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे डिझेलवर खर्च होणाऱ्या पैशांची मोठी बचत होऊ शकते. ट्रॅक्टरच्या मेंटेनन्स साठी सुद्धा जास्त खर्च येणार नाही असा दावा कंपनीने केलाय.