Electric Vehicles : इलेक्ट्रिक गाड्यांचा बाजारात धुमाकूळ; जुलैमध्ये मागणी वाढली

Electric Vehicles
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Vehicles) क्रेझ प्रचंड आहे. दिसायला अगदी आकर्षक लूक आणि महत्वाचे म्हणजे पेट्रोल- डिझेलची कटकट नसल्याने पैसे वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करायला आपलं प्राधान्य देत असतात. ग्राहकांची वाढती पसंती पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत. त्यातच आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात देशभरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची विक्री झाली आहे. जुलै 2024 मध्ये देशभरात इलेक्ट्रिक दुचाकींच्या एकूण 107716 युनिट्सची विक्री झाली आहे. वर्षानुवर्षे ही वाढ सुमारे ९७ टक्के आहे. यापूर्वी जुलै 2023 मध्ये कंपन्यांनी इलेक्ट्रिक दुचाकींच्या 54616 युनिट्सची विक्री केली होती. यामध्ये ओला, tvs, अथर आणि बजाज यांसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

काय सांगते आकडेवारी- Electric Vehicles

रिपोर्टनुसार, जुलै महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झालेल्या कंपनीचे नाव आहे ओला इलेक्ट्रिक… कंपनीने जुलै महिन्यात एकूण 41624 वाहनांची विक्री केली आहे. जुलै २०२३ मधून हाच आकडा 19406 युनिट्स पर्यंत होता.

दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे टीव्हीएस मोटर्स… टीव्हीएस मोटर्सने जुलै 2024 मध्ये एकूण 19486 युनिट्सची विक्री केली आहे. मागच्या वर्षी म्हणजे जुलै 2023 मध्ये कंपनीने 10398 गाड्यांची विक्री केली होती.

यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येत ती म्हणजे बजाज ऑटो…. बजाज ऑटोने गेल्या महिन्यात एकूण 17657 युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीने जुलै 2023 मध्ये 4131 युनिट्सची विक्री केली होती. Electric Vehicles

चौथा क्रमांक लागतो तो एथर एनर्जीचा … एथर एनर्जीने गेल्या महिन्यात एकूण 10087 वाहनांची विक्री केली. तर गेल्या वर्षी म्हणजेच जुलै 2023 मध्ये कंपनीने ६६८५ वाहनांची विक्री केली होती.

यात पाचवा नंबर लागतो तो म्हणजे हिरो मोटोकॉर्पचा … अहवालानुसार, Hero Motocorp ने जुलै 2024 मध्ये एकूण 5045 युनिट्सची विक्री केली. तर गेल्या वर्षी याच महिन्यात ही संख्या ९९० युनिट इतकी होती.