यशोमती ठाकुरांनी अधिकाऱ्याची काढली लाज, म्हणाल्या….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीच्या माजी पालकमंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी सगळ्यांसमोर कार्यकारी अभियंत्यांची लाज काढली आहे. गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पात झालेली लाखो रुपयांच्या विद्यूत साहित्याची चोरी हा सर्वस्वी सरकारी अनास्थेचा भोंगळ कारभार आहे. सरकारने शेतकरी आणि सरकारी यंत्रणेवर दुर्लक्ष केले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी केली आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळविणाऱ्यांच्या कार्यकारी अभियंता यांच्या घरापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. उद्या पर्यत काम झालं नाही तर माझ्या एवढं कोणी वाईट नाही असं म्हणत लाजा वाटत नाही का तुम्हाला असा सवालदेखील त्यांनी (yashomati thakur) या अधिकाऱ्याला केला आहे. त्यामुळे गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पातील चोरीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?
तिवसा जलसंपदा विभागांतर्गत अमरावती- नागपूर महामार्गालगत अप्पर वर्धाच्या मुख्य कालव्याच्या बाजूला गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या वॉटर लिफ्टिंगकरिता असणारी स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणा फोडून लाखोंचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. या ठिकाणी रात्रपाळीत चौकीदार नसल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी हि चोरी केली.सिचन योजनेतील लाखो रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला गेले असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या सगळ्यांना कोण जबाबदार आहे? असा सवालदेखील त्यांनी (yashomati thakur) यावेळी उपस्थित केला आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय