Electricity Price Become Expensive | ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा झटका, प्रति युनिट वाढणार इतके रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Electricity Price Become Expensive राज्यात उष्णता जास्त वाढायला लागलेली आहे. उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. परंतु यावर्षी नेहमीपेक्षा जास्त तापमान वाढलेले आहे. अनेक ठिकाणी 35 अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान पोहोचलेले आहे. आणि दिवसेंदिवस हा तापमानाचा तडाका वाढतच आहे. येत्या काही दिवसातच तापमान वाढण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. उन्हाळा वाढला की, आपल्या घरातील फ्रिज, पंखा, एसी यांसारख्या वस्तूंचा वापर वाढतो. अशा परिस्थितीत आता आदानी वीज कंपनीची वीज महागलेली आहे. याचा फटका सुमारे 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे.

मार्च महिन्यापासूनच यावर्षी उन्हाळ्याला प्रचंड सुरुवात झालेली आहे. मे महिन्यात उन्हाचा तडाका जास्त वाढणार आहे. अशातच वीज दरवाढीच्या बातम्या समोर आलेल्या आहेत. अदानी कंपनीने यावर्षी झालेल्या इंधन खर्चातील 318 कोटी 38 लाख रुपयेची वाढ वसूल करण्यासाठी ऊर्जा नियमक आयोगाकडे वीज दरवाढ (Electricity Price Become Expensive) करण्याबाबत प्रस्ताव केलेला आहे. याबाबत आयोगाने देखील मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ही इंधन दरवाढ मेमध्ये ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे.

कुणाला किती वीजबिल भरावे लागणार | Electricity Price Become Expensive

मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांना इंधन अधिभार प्रति युनिट 70 पैसे ते 1.70 रुपये एवढी वाढ होणार आहे. मे महिन्यापासून तुम्ही दर महिन्याला 0 -100 युनिटपर्यंत वीज वापर केली, तर त्याला त्या ग्राहकाला प्रति युनिट 70 पैसे भरावे लागणार आहे. तर 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापरली तर 1.30 रुपये तसेच 301 ते 500 युनिटपर्यंत वीज वापरली तर 1.5 रुपये आणि 500 अधिक वीज वापरासाठी 1.70 इंधन अधिभार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सर्वात महागडी वीज

दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीज दरवाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आलेला होता. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वीज वितरण केली जाते. आंध्रप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचा दर जास्त असल्याचे समोर आलेले आहे.