Elon Musk : एलोन मस्कसोबत काम करण्याची भारी संधी ; डिग्रीची गरज नाही, दिली अजब ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Elon Musk : प्रसिद्ध बिझनेसमॅन एलॉन मस्क पुन्हा काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत आहे. यावेळी त्यांनी नोकऱ्या देण्याची पद्धत बदलण्याचा विचार केला असून अनेक गोष्टी करू शकणारे ॲप तयार करण्याचा विचार केला आहे. त्यांनी X वर एक पोस्ट टाकली आहे आणि जगभरातील चांगल्या सॉफ्टवेअर अभियंत्यांना त्याच्या टीममध्ये सामील होण्यास सांगितले. तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात किंवा कोणत्या मोठ्या कंपनीत काम केले आहे, याने त्यांना काही फरक पडत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

डिग्रीची गरज नाही… (Elon Musk)

इलॉन मस्क यांनी यापूर्वी असेही म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीसाठी शिक्षण पदवीपेक्षा काम करण्याची क्षमता असणे अधिक महत्त्वाचे आहे. टेस्लामध्ये काम करण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की एखाद्या व्यक्तीची क्षमता त्याच्या पदवीने ठरत नाही, तर त्याच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते. ते म्हणतात की शाळांमध्ये मुलांना समस्या लक्षात ठेवण्याऐवजी ते कसे सोडवायचे हे शिकवले पाहिजे. हीच पद्धत त्यांनी टेस्ला, स्पेसएक्स आणि आता एक्समध्येही स्वीकारली आहे.

सर्व एकाच ॲपमध्ये (Elon Musk)

एक्स हे ॲप बनवण्याच्या तयारीत आहे. या ॲपमध्ये अनेक वैशिष्ट्ये असतील, जसे की X मनी, ज्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता आणि X TV, ज्याद्वारे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. Grok नावाचा AI चॅटबॉट देखील लॉन्च करण्यात आला आहे, जो आणखी चांगला बनवला जाईल. X CEO Linda Yaccarino यांनी अलीकडेच सांगितले की, या बदलांद्वारे, वापरकर्ते एकमेकांशी पूर्वीसारखे कनेक्ट होऊ शकतील.

एलॉन मस्क यांना अनेक गोष्टींसाठी वापरता येणारे ॲप तयार करायचे आहे. या ॲपमध्ये पेमेंट करणे, संदेश पाठवणे, वस्तू खरेदी करणे आणि मल्टीमीडिया वापरणे अशा अनेक सुविधा असतील. हे ॲप चीनच्या WeChat ॲपसारखे असेल, जिथे तुम्ही सोशल मीडिया वापरू शकता, वस्तू खरेदी करू शकता आणि पेमेंट देखील करू शकता.इलॉन मस्क यांना विश्वास आहे की या ॲपद्वारे ते सोशल मीडियाच्या (Elon Musk) पलीकडे जाऊन एक व्यासपीठ तयार करतील जिथे लोक कल्पना, वस्तू आणि सेवांसाठी एकाच ठिकाणी येऊ शकतील.