Elon-Musk ने विकला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X , तब्बल 33 अब्ज डॉलर्सची डील

elon musk
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी काही वर्षांपूर्वी ट्विटर (सध्याचे नाव X) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतले होते. मात्र, अनेक महत्त्वाचे बदल केल्यानंतर त्यांनी अखेर X विकण्याचा निर्णय घेतला आहे. X चा नवा मालक कोणी आहे? तर हे प्लॅटफॉर्म एलन मस्क यांच्या स्वतःच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI ने विकत घेतले आहे.

2.82 लाख कोटींमध्ये विकला X

ही डील तब्बल 33 अब्ज डॉलर (भारतीय चलनात सुमारे 2 लाख 82 हजार कोटी रुपये) मध्ये झाली आहे. याची माहिती एलन मस्क यांनी स्वतः X वर पोस्टद्वारे दिली. या करारामागे xAI ची AI स्पेशलायझेशन क्षमता आणि X ची मोठी पोहोच यांना एकत्र आणण्याचा उद्देश आहे.

एलन मस्क यांनी काय सांगितले?

X वर पोस्ट करताना मस्क म्हणाले, “X चा अधिग्रहण xAI ने सर्व-स्टॉक व्यवहाराद्वारे पूर्ण केले आहे. या करारानुसार xAI ची किंमत 80 अब्ज डॉलर आणि X ची किंमत 33 अब्ज डॉलर आहे. त्यात 12 अब्ज डॉलरचे कर्ज समाविष्ट असल्याने X चे एकूण मूल्यांकन 45 अब्ज डॉलर होते.”

मस्क पुढे म्हणाले, “X आणि xAI यांचे भविष्यातील कार्य एकमेकांशी जोडलेले आहे. डेटा, मॉडेल्स, डिस्ट्रीब्युशन आणि टॅलेंट यांना एकत्र आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.”

xAI बद्दल

एलन मस्क यांनी 2023 मध्ये xAI ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी सुरू केली. या कंपनीने Grok नावाचा AI चॅटबॉट सादर केला आहे. हा चॅटबॉट कोणत्याही विषयावर माहिती देऊ शकतो आणि AI च्या मदतीने फोटोही तयार करू शकतो.

या डीलनंतर X आणि xAI च्या प्रतिनिधींनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, X च्या भविष्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. एलन मस्क यांच्याकडे आधीच Tesla, SpaceX सारख्या मोठ्या कंपन्या आहेत, आणि आता X आणि xAI यांच्या संयोगाने ते डिजिटल क्षेत्रात आणखी मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत.