भारतात इंटरनेट सेवा क्षेत्रात मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. एलन मस्कच्या Starlink सह अनेक जागतिक कंपन्या भारतात अवघ्या ₹८४० प्रतिमाह दरात ‘अनलिमिटेड डेटा’ देणारी सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. हे घडलं, तर देशातील Airtel, Jio, Vi, BSNL यांच्यासाठी मोठं आव्हान ठरणार आहे.
अनलिमिटेड इंटरनेट फक्त ₹८४० मध्ये?
एलन मस्क यांच्या Starlink कंपनीसह Bharti Group ची Eutelsat OneWeb आणि Reliance Jio व SES यांचा जॉइंट व्हेंचर भारतात लवकरच सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करू शकतो. E T च्या रिपोर्टनुसार, Starlink भारतात केवळ \$10 (सुमारे ₹840) मध्ये अनलिमिटेड डेटा प्लॅन सुरू करू शकते. हे दर भारतात सर्वसामान्यांसाठी परवडणारे असून, ग्रामीण भागात ब्रॉडबँडची मोठी समस्या सोडवू शकतात.
प्लॅन स्वस्त पण हार्डवेअर महाग
Starlink चे डेटा प्लॅन स्वस्त असले तरी, यासाठी लागणारी हार्डवेअर किट सध्या ₹21,000 ते ₹32,000 दरम्यान असल्याने काही प्रमाणात अडचण होऊ शकते. भारतात याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास भविष्यात किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.
सॅटेलाइट इंटरनेटचे फायदे
- सॅटेलाइट इंटरनेटसाठी टॉवर किंवा फायबरची गरज नाही
- डोंगराळ, आंतरजिल्हा किंवा दुर्गम भागातही सहज इंटरनेट पोहोच
- ग्रामीण शिक्षण, हेल्थकेअर आणि प्रशासनात डिजिटल क्रांती
अडथळा काय?
भारताच्या केवळ 0.7% भूभागाला ग्लोबल सॅटेलाइट कव्हरेज आहे. त्यामुळे सध्या Starlink फक्त १५ लाख भारतीयांना सेवा देऊ शकते. दुसरीकडे, भारतात सध्या ८ लाख टेलिकॉम टॉवर्स आणि ३० लाखहून अधिक मोबाइल सिग्नल स्टेशन आहेत. त्यामुळे सॅटेलाइट इंटरनेटला जमिनीवरच्या नेटवर्कसारखं विस्तृत कव्हरेज देण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. जर Starlink ₹८४० मध्ये सेवा सुरू करत असेल, तर ते निश्चितच इंटरनेट क्षेत्रातील एक गेमचेंजर ठरेल. Jio, Airtel, Vi आणि BSNL ला त्याच्या स्पर्धेसाठी आता नव्या तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागणार आहे.




