Elon Musk : जे काम अशक्य वाटतं, ते पूर्ण करण्याची जबाबदारी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क घेतात. मग ते ड्रायव्हरलेस कार असो किंवा प्रक्षेपणानंतर रॉकेट लाँच पॅडवर परत आणणे असो. यात त्यांना यशही आले आहे. असे अशक्य वाटणारे काम पूर्ण करण्याची तयारी मस्क दिली आहे. ही ऑफर ट्रान्स-अटलांटिक बोगदा बांधण्यासाठी आहे. हा 5000 किमी लांबीचा बोगदा न्यूयॉर्क आणि लंडन दरम्यान समुद्राखाली (Elon Musk) बांधण्याचा प्रस्ताव आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, त्यांची बोअरिंग कंपनी हा बोगदा बांधण्याचे काम पूर्ण करू शकते. बेंजिंगाच्या एका अहवालानुसार, मस्क यांनी म्हटले आहे की ते हे काम अंदाजे खर्चापेक्षा (20 ट्रिलियन डॉलर्स) 1000 पट कमी किमतीत करू शकतात. त्यानुसार एलोन मस्क केवळ २० अब्ज डॉलर्समध्ये हा बोगदा बांधू शकतात.
ट्रान्स अटलांटिक बोगदा (Elon Musk)
अटलांटिक महासागराखाली एक बोगदा बांधण्याबाबत चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. या बोगद्याच्या निर्मितीचे उद्दिष्ट म्हणजे दोन देशांमधील प्रवास हवाई मार्गापेक्षाही कमी वेळेत पूर्ण करणे होय.
हायपरलूप ट्रेनसाठी बोगद्याची निर्मिती (Elon Musk)
या बोगद्याचे बांधकाम हायपरलूप ट्रेन सुरू करण्यासाठी करण्यात येईल, अशी चर्चा आहे. हायपरलूप ही एक उच्च-गती ट्रेन आहे जी निर्वात ट्यूबमधून धावते. याची संकल्पना एलन मस्क यांनी मांडली होती. हायपरलूप ट्रेनचे विविध मॉडेल सादर झाले आहेत, परंतु अद्याप एकही हायपरलूप ट्रेन सुरू झालेली नाही. असा अंदाज आहे की या बोगद्याच्या निर्मितीनंतर आणि हायपरलूप ट्रेन सुरू झाल्यानंतर न्यूयॉर्क ते लंडन या सुमारे 5000 किमी अंतराचा प्रवास फक्त एका तासात पूर्ण होईल.
अडथळ्यांची मालिका
ट्रान्स अटलांटिक बोगदा बांधण्यास अनेक आव्हाने आहेत. यापूर्वीही खर्च आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरू शकला नाही.
बेन्जिंगाच्या अहवालानुसार, या बोगद्याच्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता (Elon Musk) असेल. मस्क यांनी या बोगद्याच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली असली तरी, अद्याप या प्रकल्पासाठी ठोस योजना, सरकारी मंजुरी किंवा निधी वाटप झालेले नाही.
मस्क बोगदा तयार करू शकतील का?
एलन मस्क यांनी अनेक वर्षांपूर्वी हायपरलूप ट्रेनच्या संकल्पनेची मांडणी केली होती. त्यांनी सांगितले होते की या ट्रेनद्वारे लांबचे अंतर खूप कमी वेळेत पार करता येईल. मस्क यांनी मांडलेली हायपरलूप ट्रेनची संकल्पना 10 वर्षांहून अधिक जुनी आहे, पण अद्याप कोणतीही ट्रेन सुरू झालेली नाही. त्यामुळे मस्क हे बोगदा पूर्ण करू शकतील का, हा मोठा प्रश्न आहे.