Emergency Fund Planning : इमर्जन्सी फंड कसा तयार करावा? किती रक्कम गरजेची? पहा सर्व डिटेल्स

Emergency Fund Planning
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Emergency Fund Planning। आजकालच्या महागाईच्या दुनियेत पैशाची बचत करणं खूप गरजेचं आहे… कधी कधी आपल्या आयुष्यात अचानकपणे संकटे येऊ शकतात, उदाहरणार्थ अचानकपणे नोकरी जाणे, दवाखान्याचा खर्च, घराचे काम किंवा इतर कोणत्या अडचणी…. अशावेळी या सर्वातून सहीसलामत सुटका करून घेण्यासाठी तुमच्यासाठी इमर्जन्सी फंड असणं गरजेचं असते. हा इमर्जन्सी फंडच तुमच्या सर्व गरजा भागवू शकतो तसेच अचानकपणे पैशासाठी कोणाकडे हात पसरण्याची वेळ तुमच्यावर येत नाही. परंतु इमर्जन्सी फंड कसा तयार करावा? यासाठी तुमच्याकडे किती रक्कम असं आवश्यक आहे… ? इमर्जन्सी फंड उभारण्यासाठी तुम्हाला कोणती आयडिया वापरावी लागेल? हे तुम्हाला माहितेय का? नसेल तर मग हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे…

तर मित्रानो, इमर्जन्सी फंड उभारण्यासाठी (Emergency Fund Planning) सर्वात आधी तुमचं ध्येय निश्चित करा. सर्वप्रथम तुम्हाला किती पैसे लागतील ते ठरवा तुमची कमाई किती आहे? आणि तुम्ही दर महिन्याला किती रुपये खर्च करता याच गणित काढा… मग तुम्हला अंदाज येईल कि तुम्ही किती रुपयांचा इमर्जन्सी फंड काढू शकता. तुमचे अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपत्कालीन निधीसाठी जास्त पैसे वाचवता येतील.

इमर्जन्सी फंड हा तुमच्या पगारावर अवलंबून असतो. त्यासाठी तुमच्या पगारातून किती पैसे वाचतात यावरही ते अवलंबून असते. सर्वसाधारणपणे, एक चांगला इमर्जन्सी फंड ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाएवढा ठेवावा. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा ३० हजार रुपये खर्च करत असाल, तर तुम्ही इमर्जन्सी फंड साठी कमीत कमी ९० हजार रुपये ठेवावेत.

वेगळं खातं काढा- Emergency Fund Planning

इमर्जन्सी फंड तुमच्या सामान्य बचत खात्यापासून वेगळा ठेवण्यासाठी वेगळे खाते उघडा. हे खाते फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरा. या फंडातून काही उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही उच्च व्याजदराचे बचत खाते किंवा एफडी देखील निवडू शकता.

इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी (Emergency Fund Planning) एक अंतिम मुदत निश्चित करा. ही वेळ तुमच्या ध्येयावर आणि तुमच्या बचत दरावर अवलंबून असेल. उदाहरणार्थ, जर तुमचे टार्गेट ३ महिन्यांच्या खर्चासाठी इमर्जन्सी फंडतयार करण्याचे असेल आणि तुम्ही दरमहा १०,००० रुपये वाचवू शकता, तर ते साध्य करण्यासाठी तुम्हाला सुमारे ३-६ महिने लागू शकतात.

वेळोवेळी तुमच्या बचत आणि निधीच्या स्थितीचा आढावा घ्या. जर तुमचे उत्पन्न वाढले तर तुम्ही इमर्जन्सी फंड मध्ये जास्त पैसे गुंतवू शकता. याशिवाय , जर तुमचे खर्च वाढले तर तुमचा इमर्जन्सी फंड वाढवावा लागू शकतो. अशाप्रकारे इमर्जन्सी फंड तयार केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यास मदत होऊ शकते.