Energizer Hard Case P28K : नाद खुळा!! एकदा फुल्ल चार्ज केल्यावर 94 दिवस चालतो ‘हा’ Mobile

Energizer Hard Case P28K
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्वाचा घटक बनला आहे. सध्याचे जग तंत्रज्ञानाचे जग असून दररोज नवीन काहीतरी पाहायला मिळते. बाजारात सुद्धा अनेक कंपन्या नवनवीन फीचर्स सह मोबाईल बाजारात आणत असतात. आताही असा एक मोबाईल समोर आला आहे जो एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर तब्बल 94 दिवस टिकतो. Energizer Hard Case P28K असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तब्बल 28,000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. बार्सिलोना, स्पेन येथे आयोजित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2024 (MWC 2024) कार्यक्रमात हा मोबाईल सादर करण्यात आला आहे. या मोबाईल मुळे आता सतत मोबाईल चार्जिंग करण्याची कटकट संपणार आहे.

काय आहेत फीचर्स – Energizer Hard Case P28K

Energizer Hard Case P28K मध्ये 6.78 इंचाचा फुल-HD + डिस्प्ले आहे. कंपनीने या जम्बो बॅटरी असलेल्या मोबाईल मध्ये MediaTek Helio G99 चिपसेट बसवली आहे. मोबाईलच्या कॅमेरा बद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये 60-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 20-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 4G कनेक्टिव्हिटीसह येतो. कंपनीने या मोबाईल सोबत तीन वर्षांची वॉरंटी दिली आहे.

या स्मार्टफोनची (Energizer Hard Case P28K) खास गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 28000 mAh ची जम्बो बॅटरी वापरली आहे. याबाबत कंपनीने दावा केला आहे की या मोठ्या बॅटरी पॅकसह यूजर्सना 94 दिवसांचा स्टँडबाय बॅकअप आणि 122 तासांचा टॉकटाइम मिळेल म्हणजेच एका चार्जवर 122 तास तुम्ही बोलू शकता. कंपनी हा स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्याची शक्यता असून मोबाईलची किंमत 250 युरो म्हणजेच जवळपास 22,000 रुपये असू शकते. मात्र Energizer कंपनी त्यांचे मोबाईल भारतात लाँच करत नाही. त्यामुळे भारतीयांना या मोबाईलचा लाभ मिळणार नाही.