Energy Provide Foods | जिना चढताना तुम्हालाही दम लागतो का? आहारात करा या पदार्थांचा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Energy Provide Foods | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. लोक कामांमध्ये व्यस्त असतात. परंतु ते त्यांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही. कामाच्या व्यापामुळे त्यांची झोप देखील नीट होत नाही. तसेच व्यायाम देखील होत नाही. या सगळ्या धावपळीत अनेक लोकांना घरात ताजे आणि सकस अन्न बनवायला वेळ नसतो. त्यामुळे ते बाहेर जाऊन स्ट्रीट फूड खायला प्राधान्य देतात. परंतु या सगळ्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या आजारांचा धोका निर्माण होतो.

लोक पुरेशे सकस अन्न खात नाही. (Energy Provide Foods) त्याचप्रमाणे व्यायाम देखील करत नाही. या सगळ्यामुळे दिवसभर त्यांच्यामध्ये काम करण्याची ऊर्जा टिकत नाही. काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण व्हावी, उत्साह निर्माण व्हावा, यासाठी अनेक लोक एनर्जी ट्रिक्स आणि विविध प्रकारचे सप्लीमेंट्स देखील घेतात. परंतु यामुळे त्यांच्या आरोग्याला खूप धोका निर्माण होतो. या एनर्जी ड्रिंक्समुळे थोड्या वेळासाठी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. परंतु जर तुम्हाला नैसर्गिकरित्या स्टॅमिना वाढवायचा असेल, तर तुमच्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल. आता आपण अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या शरीरात चांगली ऊर्जा टिकून (Energy Provide Foods) ठेवतील.

ओट्स | Energy Provide Foods

अनेक लोकांना वजन कमी करायचे असेल. तर अनेक लोक ओट्स खातात. ओट्समध्ये कार्बोहाइड्रेट असतात. त्यामुळे तुमच्या शरीराला जास्त ऊर्जा प्रदान होते. तुमचे पोट देखील जास्त काळ भरलेले राहते. तसेच तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि एनर्जेटीक राहता. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात असते. या सगळ्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत चालते.

क्विनोआ

या पदार्थांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हे खाल्ल्याने तुमच्या स्नायूंच्या ऊतींना चांगला फायदा होतो. त्याचप्रमाणे हेवी वर्कआउट करण्यासाठी हा पदार्थ खूप जास्त गरजेचा आहे. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

केळी

केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्व असतात. त्यामुळे केळी आपल्या शरीराला जास्त ऊर्जा प्रदान करतात. व्यायामामुळे आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाईट कमी होतात. शरीराला वर्कआउट करण्याची ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे आपण जर जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर केळी खाल्ली, तर तुमचा स्टॅमिना देखील वाढतो आणि शरीरात ऊर्जा राहते.

पालक

पालकमध्ये लोहयुक्त पदार्थ असतात. त्यामुळे तुमच्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्यात पालक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. यात असलेले मॅग्नेशियम स्नायूंच्या कामावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्याशिवाय तुमचा थकवा दूर करण्यासाठी देखील पालक काम करतो. तुम्ही जर रोज पालकाचे सेवन केले, तर तुमच्या शरीरातील ऊर्जा जास्त काळ टिकून राहील.

चिया सीड्स

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, ते लोक अनेकवेळा त्यांच्या जेवनामध्ये पालकाचा वापर करतात. यामध्ये जास्त प्रमाणात फायबर, अँटीऑक्सिडंट आणि प्रथिने यांचे प्रमाण असते. तुम्ही जर असे नियमित सेवन केले, तर तुमच्या आरोग्याला लाभ होतो. आणि दिवसभर तुमच्या शरीरातील ऊर्जा देखील टिकून राहते.

चीया सिड्स

वेट लॉस करण्यासाठी बरेचजण चिया सीड्सचा आहारात समावेश करतात. चिया सीड्समध्ये फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. याचे नियमित सेवन केल्याने आरोग्यास लाभ मिळते, आणि दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.