प्रवाशांचा उन्हाळी प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी कोकण रेल्वेने दोन विशेष साप्ताहिक रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. मुंबई–करमळी आणि वास्को–मुझफ्फरपूर दरम्यान धावणाऱ्या या वातानुकूलित गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून, कोकणातील आणि उत्तर भारतातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
मुंबई – करमळी विशेष वातानुकूलित रेल्वेगाडी:
उन्हाळ्याच्या गर्दीचा विचार करून गाडी क्रमांक ०१०५१/०१०५२ लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०१०५१:
दर शुक्रवारी ११ एप्रिल ते २३ मे दरम्यान रात्री १०.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता करमळी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०५२:
दर शनिवारी १२ एप्रिल ते २४ मे दरम्यान दुपारी २.३० वाजता करमळीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड इ. स्थानकांवर थांबा असेल.
डबे: ८ द्वितीय वातानुकूलित, १० तृतीय वातानुकूलित आणि २ जनरेटर कार.
आरक्षण सुरू: ८ एप्रिलपासून PRS आणि IRCTC संकेतस्थळावर.
वास्को द गामा – मुझफ्फरपूर विशेष रेल्वेगाडी:
उत्तर भारतातील प्रवाशांसाठीही गाडी क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को – मुझफ्फरपूर – वास्को साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०७३११:
दर सोमवारी ७ एप्रिल ते २ जून दरम्यान दुपारी ४ वाजता वास्को द गामा येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता मुझफ्फरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३१२:
दर गुरुवारी १० एप्रिल ते ५ जून दरम्यान दुपारी २.४५ वाजता मुझफ्फरपूरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता वास्को येथे पोहोचेल.
थांबे: मडगाव, रत्नागिरी, पनवेल, कल्याण, भुसावळ, जबलपूर, प्रयागराज, पाटलीपुत्र, हाजीपूर इत्यादी.
डबे: १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, १ जनरेटर कार, १ SLR डबा.




