हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे कर्मचारी ईपीएफओच्या (EPFO) माध्यमातून पीएफ चे पैसे काढतात त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. आता कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ काढण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे नवीन बदल १ एप्रिलपासून लागू झाले आहेत. ज्यामुळे कर्मचारी पीएफ काढणे अधिक सोपे आणि जलद झाले आहे. यामुळे लोकांच्या वेळेची बचत होण्यास मदत मिळाली आहे. तर चला या नवीन बदलाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
क्लेमसाठी रक्कमेची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत –
पीएफ (PF) अॅडव्हान्स क्लेमसाठी रक्कमेची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी वैद्यकीय उपचार, शिक्षण, घर खरेदी आणि विवाहासाठी पीएफ अॅडव्हान्स क्लेम सहजपणे करू शकतात. 60 टक्के दावे ऑटो मोडमध्ये स्वीकृत करण्यात येतील, आणि तीन दिवसांच्या आत संबंधित रक्कम मिळेल.
आधार लिंकद्वारे थेट ईपीएफओच्या पोर्टलवर –
कर्मचारी आता आधार लिंकद्वारे थेट ईपीएफओच्या पोर्टलवर त्यांच्या पीएफ खात्याच्या माहितीमध्ये बदल करू शकतात. यामुळे पीएफ खात्याची माहिती अपडेट करणे सोपे झाले आहे.
पीएफ ट्रान्सफर प्रक्रिया सोपी –
पीएफ ट्रान्सफर करताना नियोक्त्यांकडून आधार आणि यूएएन व्हेरिफिकेशनची आवश्यकता आता नाही. फक्त 10 टक्के दाव्यांसाठी नियोक्त्यांचे प्रमाणन आवश्यक राहील.
कॅन्सल चेक आवश्यक नाही –
पीएफ क्लेम फॉर्मसोबत कॅन्सल चेकची आवश्यकता आता संपुष्टात आली आहे. यामुळे क्लेम प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
सदस्याला योग्य मार्गदर्शन उपलब्ध –
जर कोणाचा पीएफ क्लेम रिजेक्ट झाला, तर ईपीएफओकडून संबंधित सदस्याला योग्य मार्गदर्शन उपलब्ध होईल, ज्यात क्लेम पात्रता आणि आवश्यक अटींबद्दल माहिती दिली जाईल. ईपीएफओने लवकरच यूपीआय अन एटीएमद्वारे पीएफ पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मे-जून महिन्यात ही सेवा उपलब्ध होईल, ज्यामुळे कर्मचारी 1 लाख रुपयांपर्यंत पीएफ पैसे सहजपणे काढू शकतील. या सर्व सुधारणा कर्मचार्यांसाठी अधिक सुविधाजनक आणि जलद पीएफ क्लेम प्रक्रिया सुनिश्चित करतील.