केंद्र सरकारने PF नियमांमध्ये केले मोठे बदल ; आता सेवांसह फायदे घेणे होणार सोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने प्रॉविडेंट फंड (PF) संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले असून आता पासबुक पाहणे, ऑनलाइन क्लेम करणे, ट्रॅक करणे आणि पैसे काढणे अधिक सोपे होणार आहे. पण यासाठी कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाचे टप्पे पूर्ण करावे लागणार आहेत. योजनांचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्यासाठी सरकारने आधार पेमेंट ब्रिज व 100% बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 2024 – 25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित रोजगार प्रोत्साहन योजना (ELI) अधिकाधिक नियुक्त आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी श्रम व रोजगार मंत्रालयाने EPFO ला विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले आहेत.

UAN 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत –

नियुक्त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आधार आधारित OTP प्रक्रियेद्वारे चालू करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया नव्या कर्मचाऱ्यांपासून सुरू होऊन सर्व विद्यमान कर्मचाऱ्यांवर लागू होणार आहे. UAN चालू झाल्यानंतर कर्मचारी EPFO च्या सर्व डिजिटल सेवा सहजपणे वापरू शकतात. या सेवांमध्ये तुम्हाला PF अकाउंटचे व्यवस्थापन , PF पासबुक पाहणे आणि डाउनलोड करणे , ऑनलाइन क्लेम सादर करणे , वैयक्तिक माहिती अपडेट करणे , क्लेमचा रिअल-टाइम स्टेटस ट्रॅक करणे इत्यादी फायदे होऊ शकतात. तसेच ही प्रक्रिया 24/7 सेवा प्रदान करते, ज्यामुळे तुम्हाला अधिक फायदे मिळणार आहेत.

कशी नोंदणी करावी –

हि सेवा चालू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही EPFO सदस्य पोर्टलला भेट द्या. नंतर Activate UAN लिंकवर क्लिक करा. त्यावर UAN, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि आधार लिंक असलेला मोबाइल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल , त्याला सहमती देऊन प्रक्रिया चालू ठेवा. या OTP साठी Get Authorization PIN वर क्लिक करा आणि OTP प्राप्त झाल्यानंतर तो टाकून द्यावा . नोंदणी यशस्वी झाल्यानंतर पासवर्ड नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. हि सर्व प्रक्रिया झाल्यानंतर UAN सक्रियतेसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा समावेश केला जाणार आहे. याच्यामुळे डिजिटल गती येण्यास मदत होणार आहे.