पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; EPFO अंतर्गत 2859 जागांसाठी मेगाभरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत तब्बल 2859 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि लघुलेखक या पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 26 एप्रिल 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटन
एकूण पदसंख्या – 2859
भरले जाणारे पद –
सामाजिक सुरक्षा सहाय्यक – 2674 पदे
लघु लेखक – 185 पदे

भरती प्रकार – सरकारी
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सामाजिक सुरक्षा सहाय्यक – बॅचलर पदवी आणि टायपिंग स्पीड इंग्रजी 35 W.P.M. अथवा हिंदी 30 W.P.M. असावे.
लघुलेखक – 12 वी पास आणि कौशल्य चाचणी मानदंड.

मिळणारे वेतन –

सामाजिक सुरक्षा सहाय्यक – ₹२९२००/- ते  ₹९२३००/- दरमहा
लघुलेखक – ₹२५,५००/- ते ₹८१,१००/- दरमहा (EPFO Recruitment 2023)

वय मर्यादा – 18 ते 27 वर्ष
अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹७००/-
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

असा करा अर्ज –

सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निधी संघटन च्या अधिकृत वेबसाईट www.epfindia.gov.in ला भेट द्या.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा.
आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.epfindia.gov.in/site_en/index.php

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY