EPFO Rule Change | कर्मचाऱ्यांना दिलासा!! EPFO ने पैसे काढण्याच्या नियमात केले मोठे बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी नवीन आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने त्यांचे पीएफ फंडातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत. नोकरी करत असताना कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये त्यांच्या पगारातून काही रक्कम कट होऊन त्यांच्या पीएफ खात्यात (EPFO Rule Change) जमा होत असते. आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना हे पैसे मिळत असतात. जर मध्यंतरी कोणतीही आणीबाणी आली, तर कर्मचाऱ्यांना हे पैसे वापरता येत नव्हते. परंतु आता आरोग्य आणीबाणीच्या काळात पीएफ फंडातून कर्मचाऱ्यांना पैसे काढता येणार आहे. आता ईपीएफ सदस्य 68J या दाव्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना एक लाख रुपये काढता येणार आहे. ही मर्यादा या आधी केवळ 50000 इतकी होती.

या संदर्भातील सॉफ्टवेअर अप्लिकेशनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. त्यामुळे सदस्य त्यांच्या गरजांसाठी फॉर्म 31 द्वारे पीएम फंडातून पैसे काढू शकतात. यामध्ये लग्न, कर्जाची परतफेड, घर, जमीन फ्लॅट खरेदी करणे, उपचार घेणे, मुलांचे शिक्षण यांसारख्या गरजांसाठी तुम्हाला आता पैसे काढता येणार आहे.

पॅरा 68 J अंतर्गत पैसे काढण्यासाठी नवीन मर्यादा | EPFO Rule Change

पीएफ सदस्य ईपीएफच्या पॅरा 68 J अंतर्गत एखादा कर्मचारी त्यांच्या स्वतःच्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या आजारपणासाठी उपचारासाठी पीएफ फंडातून आधी पैसे घेऊ शकतो. याआधी सदस्यांना केवळ पन्नास हजार रुपये काढता येत होते. परंतु नियमांमध्ये बदल केल्यानंतर आता सदस्य या पीएफ फंडातून एक लाख रुपयेपर्यंत किंवा सहा महिन्यांच्या मूळ पगार आणि डीए यांपैकी जे कमी असेल ते काढू शकतो. यासाठी कर्मचाऱ्यांना फॉर्म 31 सोबत प्रमाणपत्र ही देखील सादर करावे लागणार आहे. ज्यावर त्यांची आणि डॉक्टरांचे सही असणे गरजेचे आहे.

पॅरा 68J काय आहे ज्या अंतर्गत मोठी मर्यादा आहे?

आपत्कालीन गरज असताना कर्मचारी पीएफ फंडातून पैसे काढू शकतो, त्यासाठी काही नियम आणि मर्यादा आहेत. कलम 68J मध्ये आजाराच्या उपचारासाठी पीएफ खात्यातून किती रक्कम काढायची आणि त्यासाठी आवश्यक अटींची माहिती दिली आहे.

फॉर्म 31 म्हणजे काय?

ईपीएफ खात्यातून आगाऊ पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्याला फॉर्म 31 भरणे आवश्यक आहे. फॉर्म 31 अंतर्गत, कर्मचारी खाली नमूद केलेल्या वस्तूंमधून पैसे काढू शकतात.

  • पॅरा 68B – घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी
  • पॅरा 68BB – बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी
  • परिच्छेद 68H – विशेष गरजांसाठी
  • पॅरा 68J – स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या आजाराच्या उपचारासाठी
  • पॅरा 68K – तुमच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी
  • अपंग कर्मचारी पॅरा 68N अंतर्गत पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात.
  • कर्मचारी त्यांच्या निवृत्तीच्या एक वर्ष आधी Para 68NN अंतर्गत आंशिक पैसे काढू शकतात.

EPF म्हणजे काय?

कर्मचाऱ्यांचे निवृत्ती जीवन सुधारण्यासाठी ईपीएफ ही सरकारी योजना आहे. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी त्यांच्या नोकरीदरम्यान दरमहा ठराविक रक्कम जमा करतात. सोबतच सरकार त्यावर दरवर्षी व्याज देते.