EPFO Rule | EPFO कर्मचाऱ्यांना देणार तब्बल 50 हजार रुपयांचे बोनस, फक्त पूर्ण करा ही एक अट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

EPFO Rule | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हा ईपीएफओच्या (EPFO Rule) माध्यमातून गुंतवणूक करत असतो. निवृत्तीनंतर त्याला कोणत्याही गोष्टीत आर्थिक कमतरता भासू नये, म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये अनेक गुंतवणूक करत असतात. निवृत्ती झाल्यानंतर गुंतवलेली ही रक्कम त्या कर्मचाऱ्याला पेन्शन स्वरूपात दिली जाते. अशातच आता ईपीएफओने एक मोठी घोषणा केलेली आहे. यानुसार आता पीएफ तर्फे खातेदारांना तब्बल 50 हजार रुपयांचे बोनस दिला जाणार आहे. परंतु हा बोनस मिळवण्यासाठी त्यांना काही अटींची पूर्तता देखील करावी लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला हा 50 हजाराचा बोनस मिळणार आहे.

50000 रुपयांच्या मिळणार बोनस | EPFO Rule

पीएफचे (EPFO Rule) असे अनेक नियम आहेत. जे लोकांना अजूनही माहित नाही. यातीलच एक नियम आहे. तो म्हणजे लॉयलिटी कम लाईफ बेनिफिट्स या नियमांतर्गत कर्मचाऱ्यांना आता 50 हजार रुपयांचा जास्तीचा फायदा मिळणार आहे. यासाठी एक अट आहे. ती म्हणजे कितीही वेळा तुम्ही नोकरी बदलली, तरी सतत 20 वर्षे एकच पीएफ खात्यात गुंतवणूक केल्यास खातेधारकाला तब्बल 50 हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. सतत 20 वर्षे खातेधारकांनी जर आपले पीएफ अकाउंट बदलले नाही, तर त्या व्यक्तीला या पीएफचा फायदा होणार आहे

फायदा नेमका कोणाला होणार | EPFO Rule

लॉयलिटी कम लाईफ या नियमाचा फायदा देशातील लाखो लोकांना होणार आहे. ज्या खातेधारकांचे मूळ वेतन 5 हजार रुपयांपर्यंत आहे. त्यांना 30 हजार रुपये रॉयल्टी कम लाईफ मिळेल. आणि ज्या लोकांचे मूळ वेतन हे 5001 ते 10 हजार रुपये या दरम्यान आहे. त्यांना 40 हजार रुपये एवढे बोनस मिळेल. तर ज्या लोकांचे मूळ वेतन 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांना 50 हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.

या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे

पीएफ खायला पैसे जमा करताना तुम्हाला जर 50 हजार रुपये बोनस मिळवायचे असेल, तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही नोकरी बदलताना सध्या चालू असलेले पीएफचे खातेच कायम ठेवायचे आहे. म्हणजेच नोकरीच्या ठिकाणी देखील पूर्वीच्या पीएफ खात्यात तुमची रक्कम जमा होईल. त्यामुळे तुम्ही सतत 20 वर्षे जर एकाच कंपनीमध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल.