कॅनॉट प्लेसमध्ये उभारणार महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरातील सिडको कॅनॉट प्लेस गार्डनमध्ये महापालिकेकडून महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. महापालिकेने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे हा पुतळा धातूचा असून त्याची उंची 16 फूट असणार आहे. खाली 18 फूट उंच चौथरा बांधून त्यावर हा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 85 लाख रुपयांचा खर्च होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

सध्या कॅनॉट प्लेस गार्डनमध्ये महाराणा प्रताप यांचा अर्धाकृती पुतळा असून तो काढून तिथेच नवीन पुतळा उभारण्यात येणार आहे. शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यात यावा. अशी मागणी राजपूत समाजाकडून अनेक वर्षापासून होत आहे. याची दखल घेत काही वर्षापूर्वी महापालिकेने हा निर्णय घेतला. मात्र पुढे याबाबत कोणतीच हालचाल झाली नाही. आता महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे.

महापालिकेचे उपअभियंता राजेंद्र वाघमारे यांनी बोलताना सांगितले, महापालिका प्रशासनाने महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या कामासाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे. आणि आता निविदा प्रसिद्ध झाली आहे. यात अश्वारुढ पुतळा तयार करून नियोजित स्थळी चौधर्‍याचे सुसंगत डिझाईनचे आरसीसी कॉंक्रिटचे बांधकाम करून तो बसविणे आणि तिथे आवश्यक योजनेचे काम करणे या कामांचा समावेश आहे. कला संचानालयाने यासह इतर आवश्यक परवानगी घेण्याचे कामामध्ये संबंधित एजन्सीकडे राहणार आहे.

Leave a Comment