हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 5 आणि 7 मार्च 2024 रोजी आशियातील मीडिया आणि मनोरंजन लँडस्केपचा कार्यक्रम (फिक्की फ्रेम्सची 24 वी आवृत्ती) मुंबईमधील पवई लेक येथे पार पडणार आहे. यात फिक्की फ्रेम्सच्या परिषदेतमध्ये भारतीय अभिनेत्री राणी मुखर्जी आणि तुर्की स्टार हांडे एर्सेल बोलवण्यात आलेल्या दिग्गजांपैकी एक असणार आहेत. त्यामुळे तुर्कीश स्टार हांडे एर्सेलसह अभिनेत्री राणी मुखर्जी स्टेज शेअर करताना दिसून येईल.
मुख्य म्हणजे, FICCI द्वारा आयोजित ‘फिक्की फ्रेम्स’ कार्यक्रम सर्वात मोठ्या मीडिया आणि मनोरंजन उद्योगांच्या कार्यक्रमांपैकी एक आहे. यावेळी FICCI फ्रेम्स 2024 ची थीम “RRR म्हणजेच रिफ्लेक्शन्स, रिॲलिटीज आणि रोड अहेड” अशी ठेवण्यात आली आहे. जी मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकसित होत असलेल्या लँडस्केपमध्ये चर्चा आणि अन्वेषणासाठी एक व्यासपीठ तयार करेल.
हे कलाकार ही सहभाग नोंदवतील..
या कार्यक्रमांमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी आणि तुर्की स्टार हांडे एर्सेल व्यतिरिक्त इतर कलाकार मंडळी देखील सहभाग नोंदवतील. ज्यामध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद एल राय आणि अनुभव सिन्हा, डायनॅमिक जोडी राज आणि डीके यांचा देखील समावेश असेल. तर, इतर भारतीय अभिनेते कलाकार विविध सत्रांमध्ये सहभागी होतील. या कार्यक्रमात आयुष्मान खुराना देखील या मेगा शोचा एक भाग असेल.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अर्जुन नोहवार, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचीही उपस्थिती राहील. तसेच, सुशांत श्रीराम, कंट्री डायरेक्टर, प्राइम व्हिडिओ इंडिया, मोनिका शेरगिल, नेटफ्लिक्स इंडिया, दानिश खान, Sony LIV, StudioNext, Sony Pictures Networks India, इरिना घोष, व्यवस्थापकीय संचालक, मायक्रोसॉफ्ट इंडिया, यांचा ही सहभाग असेल.
स्पीकर्सच्या यादीत कोण असेल?
FICCI फ्रेम्स 2024 च्या स्पीकरच्या यादीत, अजय बिजली, PVR आयनॉक्सचे व्यवस्थापकीय संचालक, एमी-विजेता निर्माता एकता आर, अक्षय विधानी, अग्रगण्य भारतीय स्टुडिओ यशराज फिल्म्सचे सीईओ, FICCI मीडिया आणि मनोरंजन समिती आणि Viacom18 Media चे सीईओ, प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद एल. राय, हंसल मेहता, अनुभव सिन्हा, राज निदिमोरू, कृष्णा डी.के. यांची नावे असतील.