Escalator Accident : एस्केलेटर वापरा, पण जरा सांभाळून!! ‘ही’ एक चूक घेईल जीव; VIDEO पाहून लागेल धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Escalator Accident) मॉल, रेल्वेस्थानक, मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट अशा सगळ्या ठिकाणी एस्केलेटरचा वापर केला जातो. ही सुविधा खास करून वृद्ध लोकांसाठी फार फायदेशीर आहे. कारण, एस्केलेटर वापरतेवेळी जिने चढायची किंवा उतरायची गरज पडत नाही. मात्र, सोयीची वाटणारी ही सुविधा काहीवेळेस धोक्याची ठरू शकते. एस्केलेटर भारतात येऊन बराच काळ लोटला आहे. तरीही बरेच लोक एस्केलेटर वापरताना घाबरतात. एस्केलेटरवर पाय टाकायचा म्हटलं की, कितीतरी लोकांची भांबेरी उडते. अशावेळी एक चूक जीवघेणी ठरू शकते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून तुम्हाला कळायचं बंद होईल.

व्हायरल व्हिडीओ (Escalator Accident)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये एस्केलेटरचा वापर करून जिना वर- खाली कारण जर कुणाकडून निष्काळजीपणा घडला तर त्याचे मोठे घातक परिणाम होऊ शकतात. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एस्केलेटरवर एक हाय हिल्सची जोड ठेवली आहे. जी एस्केलेटरमध्ये अडकून आपल्या डोळ्यासमोर तुटताना दिसतेय. यातली एक हिल चप्पल आधी एस्केलेटरच्या आत गेली आणि त्यानंतर दुसरीसुद्धा एस्केलेटरच्या आत जाताना दिले. हा व्हिडीओ शेअर करून एस्केलेटर वापरताना खबरदारी घेणे किती गरजेचे आहे ते सांगण्यात आले आहे.

एस्केलेटर ठरू शकतो जीवघेणा

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया X (जुने ट्विटर) हँडलवर Manak Gupta नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हे भयानक आहे. एस्केलेटर किती धोकादायक असू शकतात ते पाहा. लहान मुले व वृद्धांनी काळजी घ्यावी’. (Escalator Accident) या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय, ‘एस्केलेटरवर टोकदार चप्पल आणि सैल कपडे खरोखर धोकादायक असू शकतात’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘हे खरोखरच खूप धोकादायक आहे’.

एस्केलेटरमूळे अपघात

आतापर्यंत एस्केलेटरशी संबंधित कित्येक अपघात झाले आहेत. यातील कितीतरी घटना या भारतात घडल्या आहेत. अलीकडेच रायपूरमध्ये एक घटना घडली होती. ज्यामध्ये एस्केलेटरवर चढताना एका मुलाचा हात घसरून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. असे देशात अनेक ठिकाणी विविध प्रकार घडले आहेत. (Escalator Accident) तूर्तास, देशातील एस्केलेटर संबंधित अपघातांची आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र, एस्केलेटरचा वापर करताना निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो याचा अंदाज व्हायरल व्हिडीओवरून येत आहे.