Essential Medicine | आज-काल महागाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अगदी वैद्यकीय उपचारांपासून ते औषधांपर्यंतचे सगळेच खर्च व मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु आता या सगळ्या महागाईमध्ये वैद्यकीय उपचार आणि औषधाच्या खर्चापासून सर्वसामान्य लोकांना आता दिलासा मिळालेला आहे. हा मोठा दिलासा सरकारने दिलेला आहे. तो म्हणजे आता 54 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. यामध्ये मधुमेह, हृदय, कानाच्या रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टी विटामिन्स इत्यादी औषधांचा समावेश आहे. या औषधांवरील किमती कमी केलेल्या आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
काही औषधे लोकांना नियमितपणे घ्यावी लागतात. परंतु त्याच्या किमती प्रचंड असल्याने त्यांच्या आर्थिक आर्थिक भार वाढतो. परंतु आता अत्यावश्यक औषधांच्या (Essential Medicine) किमती घट करण्याचा निर्णय नॅशनल फार्मासिटिकल प्रोसेसिंग ऑथॉरिटीच्या 124 बैठकीत घेण्यात आलेला आहे. एनपीपीए ही देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक आवश्यक औषधांच्या किमती ठरवत असते. यावेळी या बैठकीत 54 औषधे आणि 8 विशेष औषधांच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत.
कोणत्या औषधांच्या किमतीत घट | Essential Medicine
या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार 54 औषधांच्या किमतीमध्ये घट करण्यात आलेली आहे. यामध्ये मधुमेह, हृदय, प्रतिजैविक, विटामिन डी, मल्टी विटामिन, कानाची औषधे इत्यादींचा समावेश आहे. मागील महिन्यात देखील सरकारने अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमतीत घट केली होती. यामध्ये 41औषधांच्या आणि सहा विशेष औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. यामध्ये अँटिबायोटिक्स, मल्टी विटामिन्स, मधुमेह, हृदय यासंबंधी औषधांचा समावेश होता. त्याचप्रमाणे यकृत्याची औषधे गॅस आणि ऍसिडिटीचे औषधे, पेन किलर, ऍलर्जीची औषधे यांचा देखील समावेश होता.
10 कोटींपेक्षा अधिक लोकांना होणार लाभ
औषधांच्या किमती कमी केल्यामुळे आता करोडो सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे. सध्या देशामध्ये 10 कोटींपेक्षा अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. इतर देशांच्या तुलनेत हा आकडा खूपच जास्त आहे त्यामुळे अनेक रुग्णांना या औषधावर अवलंबून राहावे लागते. परंतु आता मधुमेहाच्या औषधाच्या किमती कमी केल्यामुळे अनेक मधुमेह रुग्णांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे.