कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मानव कल्याणकारी संघटना, महाराष्ट्र राज्य NGO च्या अंतर्गत महात्मा फुले विचार मंचाची सलिम पटेल यांनी स्थापना केली. त्याच वेळी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटना व मानव कल्याणकारी संघटना यांच्या निवडीही करण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या मानव कल्याणकारी संघटनेची बैठक संस्थापक/ राज्याध्यक्ष सलीम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष अंकुशराव कणसे, शशांक नांगरे, राज्य कार्यकारीणी सदस्य रफीक मुल्ला, अविनाश फुके सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष इम्रान मुल्ला व संभाजी ब्रीगेडचे सुजीत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपंन्न झाली. त्यावेळी मानव कल्याणकारी संघटना अंतर्गत महात्मा फुले विचार मंचाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निसार मुल्ला, मानव कल्याणकारी संघटनेच्या कराड उत्तर तालुका कार्याध्यक्ष पदी धनंजय राजमाने, कराड दक्षीण तालुका उपाध्यक्ष पदी शबाना मुल्ला, मसुर शाखा संघटक पदी जितेंद्र गरवरे, पाडळी शाखा अध्यक्ष पदी अरबाज पटेल व सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या पाटन तालुका अध्यक्ष पदी योगेश दुपटे यांची निवड करण्यात आली.
त्यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना राज्याध्यक्ष सलीम पटेल म्हणाले, ही संघटना कोणत्याही पक्ष पार्टीचा विरोधात नसून सर्वसामान्य जनतेचा अधिकार जनतेला मिळवून देण्यासाठी व अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन उभारण्यासाठी मानव कल्याणकारी संघटनेची वाटचाल सुरू राहील. व लोकांपर्यंत महात्मा जोतिबा फुले यांचे विचार पोहचवण्याकरीता संघटनेच्या अंतर्गत महात्मा फुले विचार मंचाची स्थापना केली आहे. अशी ग्वाही देत छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या विचारांच्या प्रेरणेने मानव कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य(NGO) ची स्थापना करण्यात आलेली आहे. असे विचार त्यांनी व्यक्त केले.
त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अनिलदादा कांबळे, सातारा जिल्हा अध्यक्ष नितीनभाऊ आवळे, सातारा जिल्हा संघटक प्रकाश पवार, कराड उत्तर तालुका अध्यक्ष विशालदादा पुस्तके, कराड दक्षीण तालुका अध्यक्ष प्रकाश काळे, युवकचे तालुका संघटक अभिजीत पाटील, उब्रज प्रभाग अध्यक्ष अरबाज अत्तार, राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद चव्हाण, कराड तालुका अध्यक्ष सचिन भिसे, कराड शहर अध्यक्ष विकी शहा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत सातारा जिल्हा अध्यक्ष नितीनभाऊ आवळे यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद चव्हाण यांनी मानले.