उद्योग विभागांच्या आस्थापनांना मतदानादिवशी सुट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार मोठ्या जोरात सुरू असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क सर्वांना बजावता यावा यासाठी उद्योग विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

वेतनात कोणतीही कपात नाही

उद्योग ऊर्जा कामगार आणि खनीकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 135 ब नुसार निवडणूक क्षेत्रातील कोणत्याही व्यवसाय व्यापार औद्योगिक उपक्रम केव्हा आस्थापनात काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली असेल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योगसमूह महामंडळ, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

उद्योग विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे उद्योग, समूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनाने या सूचनांचा काटेकोरपणे पालन करावं मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही उद्योग ऊर्जा कामगार आणि खाली कर्म विभागाने दिला आहे.