Ethenol Production | आपल्या भारतात इथेनॉलची निर्मिती सर्वात जास्त ऊसापासून केली जात होती. परंतु आता इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ केल्यानंतर तेल उत्पादक कंपन्यांनी मक्यापासून होणाऱ्या इथेनॉलला चांगले अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. आणि आता यानंतरच केंद्र सरकारने देखील इथेनॉल संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
तो म्हणजे आता इथेनॉलचे उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी सरकारने आता उसाऐवजी मक्याचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साखरेची ही उपलब्धता निश्चित करण्यासाठी सरकारने हे नवीन धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे आता मक्यापासून जास्तीत जास्त इथेनॉलची निर्मिती होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
सहकारी संस्थांकडून मक्याचा पुरवठा होणार
या इथेनॉलच्या निर्मितीबाबत सरकारने हा मोठा बदल केलेला आहे. त्यामुळे आता इथेनॉलच्या निर्मात्यांना सहकारी संस्थांकडून एका ठराविक दराने मक्याचा पूर्ण पुरवठा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे आता इथेनॉलचे उत्पादन देखील निश्चित होणार आहे. या सरकारच्या या निर्णयामुळे आता बाजारात साखरेची उपलब्धता देखील निश्चित होणार आहे.
या वर्षी साखरेचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होऊ लागले होते. आणि ते उत्पादन टिकून राहावे ते कमी होऊ नये. म्हणून सरकारने हा एक निर्णय घेतलेला आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता यावर्षी साखरेच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
कारण यावर्षी अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण अगदी कमी झाले आहे. त्यामुळे अगदी दुष्काळयुक्त परिस्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे जर इथेनॉल निर्मितीसाठी उसाची निवड केली, तर साखर उत्पादनात घट होईल. आणि यामुळेच आता मक्यापासून इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी सरकारने चालना दिलेली आहे.
मकेचा पुरवठा 2291 रुपये प्रतिक्विंटल दराने होणार | Ethenol Production
हाती आलेल्या माहितीनुसार आता सरकारने सहकारी संस्था नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्स्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांना इथेनॉल तयार करण्यासाठी 2291 रुपये प्रतिक्विंटल दराने मका पुरवठा करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता या दोन्ही सहकारी संस्था 2023 आणि 2024 या वर्षा 2029 रुपये प्रतिक्विंटल दराने मका खरेदी करतील असे सांगण्यात आलेले आहे.
उसापासून होती सर्वात जास्त इथेनॉलची निर्मिती
आपल्या देशात उसाचे पीक सर्वाधिक घेतले जाते. त्यामुळे इथेनॉल बनवण्यासाठी देखील उसाचा वापर केला जात आहे. तसेच उसापासून साखर ही बनवली जाते. परंतु साखरेच्या दरात वाढ झालेली आहे. आणि बाजारात जेवढी मागणी आहे त्या मागणीच्या तुलनेमध्ये साखरेचा पुरवठा कमी पडलेला आहे.
त्यामुळे आता सरकारनं साखर कारखान्यांना इथेनॉल बनवण्यासाठी उसाचा वापर करू नये. अशी माहिती दिलेली आहे. आणि त्या ऐवजी मकेचा वापर करून इथेनॉल बनवण्याची देखील सूचना दिलेली आहे. या वर्षी साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने पुढील विचार करूनच हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
देशामध्ये 22.48 दशलक्ष टन मक्याचे उत्पादन अपेक्षित
जुलै 2023 ते 2024 या दरम्यान वर्षातील पीक मका उत्पादन 22.48 दशलक्ष टन असल्या सरकारला अपेक्षित आहे तेल कंपन्यांनी कॉर्न पासून बनवलेले इथेनॉल खरेदीचे दर 5.19 रुपये प्रतिलिटर केले आहे.