हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या महागाईबरोबर गरजाही वाढल्यामुळे लोक कमाईसाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचा ही समावेश आहे. सध्याच्या काळात फक्त शेतवर जगणे हे शेतकऱ्यांसाठी अशक्य झाले आहे. म्हणूनच ते उत्पन्नासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. यामध्ये निलगिरीची (Eucalyptus) लागवड करणे हा सर्वात फायदेशीर आणि नफा देणारा पर्याय आहे. कारण, या झाडाच्या लाकडाला बाजारात मोठी मागणी आहे. त्यातून शेतकरी करोडोंचा नफा मिळवू शकतात.
निलगिरीची लागवड प्रक्रिया
निलगिरी हे मूळचे ऑस्ट्रेलियातील झाड आहे. परंतु भारतात त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. या झाडांची लागवड करण्यासाठी 30-35 अंश सेल्सिअस तापमान आणि चिकणमाती माती योग्य मानली जाते. शेतात चांगली नांगरणी आणि समतोल प्रक्रिया करून, 5 फूट अंतरावर खड्डे तयार करावे. त्यामध्ये निलगिरीची रोपे लावल्यास काही वर्षांत ती विकसित होतात.
आर्थिक फायदे
निलगिरीची झाडे पूर्ण वाढीसाठी 8-10 वर्षे घेतात. एका हेक्टर जमिनीत सुमारे 4000 झाडे लावता येतात. झाडे विकसित झाल्यावर त्याच्या लाकडाची विक्री केल्यास करोडोंचा नफा मिळतो. याचे लाकूड प्रामुख्याने फर्निचर आणि प्लायवूडसाठी वापरले जाते. बाजारात त्याला कायम मागणी असल्याने शेतकऱ्यांसाठी हा एक फायदेशीर व्यवसाय ठरतो.