बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत; मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु असून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी एकमेकांसमोर उभी आहे. मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यास देशातील संविधान नष्ट होईल आणि देशात पुन्हा निवडणुकांचं होणार नाहीत असा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत असतो. या आरोपाला प्रत्युत्तर देत खुद्द बाबासाहेब आंबेडकर आले तरी संविधान संपवू शकत नाहीत असं पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) म्हंटल आहे. राजस्थानमधील बारमेर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी कठोर शब्दात विरोधकांचा समाचार घेतला.

आपल्या भाषणात मोदी म्हणाले, निवडणुका आल्या की संविधानाच्या नावावर खोटे बोलणे ही भारतीय आघाडीची फॅशन झाली आहे. SC -ST , OBC बंधू-भगिनींसोबत अनेक दशकांपासून भेदभाव करणारी काँग्रेस जुने रेकॉर्ड खेळत आहे. बाबासाहेब जिवंत असताना ज्यांनी त्यांचा पराभव केला, ज्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न मिळू दिला नाही, ज्यांनी देशात आणीबाणी लादून राज्यघटना रद्द करण्याचा प्रयत्न केला, तीच लोक आज मोदींना शिव्या देण्यासाठी संविधानाच्या नावाखाली लबाडीचे पांघरुण घेत आहे. मात्र हे तेच मोदी आहेत ज्यांनी देशात प्रथमच संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, या इंडिया आघाडीच्या लोकांमध्ये भारताविरुद्ध किती द्वेष आहे, हे त्यांच्या जाहीरनाम्यातही दिसून येते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर फाळणीची दोषी असलेल्या मुस्लिम लीगची छाप आहे. आता इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट असलेल्या आणखी एका गटाने देशाविरोधात अत्यंत धोकादायक घोषणा केली आहे. भारताची अण्वस्त्रे आम्ही नष्ट करू, असे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात लिहिले आहे. भारतासारख्या देशात जिथे दोन्ही बाजूंच्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत, त्या देशात अण्वस्त्रे संपवायला हवीत का? पण हा इंडीया आघाडीचा विचार आहे असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.