‘युतीत शून्य जागा जरी मिळाली तरी मान्य’ गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – भाजपचं लोकसभा मिशन या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती असणार आहे. यामध्ये युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असे मोठे विधान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी केले आहे. भाजपच्या लोकसभा मिशनवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केले आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
‘भाजपाचे मिशन 145 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहे. तेव्हा या युतीमध्ये नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तो आम्हाला मान्य राहील फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे’ असे गुलाबराव (gulabrao patil) यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊतांवर टीका
भाजपच्या लोकसभा मिश वरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती. याबद्दल गुलाबराव पाटलांना (gulabrao patil) विचारले असता संजय राऊत यांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही. कुणीतरी मागच्या दरवाज्याने येणाऱ्या माणसाने हे म्हणावं आणि त्याला आपण मान्यता द्यावी, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!