हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात चेंगराचेंगरीची (Hathras Stampede) दुर्दैवी घटना घडली. बाबा हरिनारायण साकार उर्फ भोले बाबा यांच्या एका सत्संग कार्यक्रमानंतर हि चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये १२१ पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच हि चेंगराचेंगरी कशामुळे झाली याची चौकशी सुद्धा सुरु आहे. मात्र याच दरम्यान, आता खुद्द भोले बाबा (Bhole Baba) यांनी एक बेताल विधान केलं आहे. आपल्या नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही टाळू शकत नाही, प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे असं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना भोले बाबा म्हणाले, 2 जुलैच्या घटनेपासून मी डिप्रेशनमध्ये गेलो आहे, मी अत्यंत व्यथित आहे. परंतु जे घडणार आहे त्याला कोण थांबवू शकत?? जो या जगात आला आहे त्याला एक ना एक दिवस जायचं आहेच असं त्यांनी म्हंटल. तसेच त्यांनी या चेंगराचेंगरी मागे काहीतरी षडयंत्र असल्याची शंकाही उपस्थित केली. सत्संगाच्याकार्यक्रमात कोणीतरी विषारी फवारणी केली. यामागे काही ना काही षडयंत्र रचले गेले आहे. सनातन आणि सत्याच्या आधारे चालणाऱ्या त्यांच्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचा आरोप भोले बाबा यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील, आमचा तपास यंत्रणांवर विश्वास आहे असं भोले बाबा यांनी म्हंटल.
रिपोर्टनुसार, हाथरस सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर भोले बाबांनी सध्या प्रवचन देणे बंद केले आहे. हातरसमधील दुर्घटनेनंतर चरणराजचा मुद्दा खोटा प्रचार करण्यात आला. सिकंदरावांसह कोणत्याही सत्संगात मी मंचावरून असे काहीही बोलले नाही असं भोले बाबानी स्पष्ट केलं आहे. तसेच या चेंगराचेंगरीत ज्या कुटुंबांचे नुकसान झाले. मी आणि संपूर्ण आश्रम परिवार त्यांच्यासोबत आहोत असेही त्यांनी सांगितलं.