पंतप्रधान मोदींच्या मुळ गावी सापडले 800 इ.स.पूर्व मानवी वस्तीचे पुरावे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर या मूळ गावात 800 इ.स.पू जुन्या मानवी वस्तीचे पुरावे सापडले आहेत. ही वस्ती वैदिक, पूर्व -बौद्ध, महाजनपद किंवा कुलीन प्रजासत्ताकांच्या समकालीन असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या संशोधक या वस्तीचे अधिक संशोधन करत आणखीन नवीन पुरावे मिळतात का हे पाहत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वडनगर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, भौतिक संशोधन प्रयोगशाळा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि गुजरातमधील वडनगर येथील डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी संशोधन मोहीम सुरू केली होती. यामध्येच त्यांना 800 इ.स.पू. म्हणजेच ख्रिस्त युगापूर्वीचे जुन्या मानवी वस्तीचे काही पुरावे आढळून आले आहेत.

आयआयटी खरगपूरने शुक्रवारी प्रसारित केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, वडनगर येथील सखोल पुरातत्व उत्खननाच्या अभ्यासातून हे देखील दिसून येते की, या 3,000 वर्षांमध्ये विविध साम्राज्यांचा उदय आणि पतन तसेच मध्य आशियाई योद्ध्यांनी भारतावर वारंवार केलेले हल्ले, पाऊस किंवा दुष्काळ यांसारख्या बदलांमुळे प्रभावित झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, हा संशोधन आढावा एल्सेव्हियरच्या जर्नल क्वाटरनरी सायन्स रिव्ह्यूजमध्ये ‘हवामान, मानवी वसाहत आणि स्थलांतरण आणि मध्ययुगीन काळापासून सुरुवातीच्या काळातील स्थलांतर: वडनगर, पश्चिम भारतातील नवीन पुरातत्व उत्खननांमधला पुरावा’ या विषयासह प्रकाशित झाला आहे.

दरम्यान, वडनगरमध्ये ASI ला उत्खनन करत असताना, या अभ्यासाला पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालय, वडनगर येथे भारतातील पहिले प्रायोगिक डिजिटल संग्रहालय बांधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. संस्थेच्या म्हणण्यानुसार, वडनगर आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन येथील संशोधनाला सुधा मूर्ती गेल्या पाच वर्षांपासून निधीतून पाठबळ देत होत्या. मुख्य म्हणजे, वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ गाव असल्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रित होते.

उत्खननात काय सापडले?

संशोधकांना गावामध्ये उत्खनन केल्यानंतर मौर्य, इंडो-ग्रीक, शक-क्षत्रप, हिंदू-सोळंकी, सल्तनत-मुघल (इस्लामिक) ते गायकवाड-ब्रिटिश वसाहती राजवट या सात सांस्कृतिक कालखंडांची उपस्थिती आढळून आली आहे. याबाबतची माहिती ASI पुरातत्वशास्त्रज्ञ अभिजीत आंबेकर यांनी दिली आहे. तसेच हे एक विकसित शहर असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. विशेष बाब म्हणजे, ASI ला उत्खननात सर्वात जुना बौद्ध मठ देखील सापडला आहे.