मतदान केंद्रावरील EVM मशिनची कुऱ्हाडीने तोडफोड; नांदेडमधील धक्कादायक प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 8 भागात दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. परंतु या मतदान प्रक्रियेवेळी नांदेड लोकसभा मतदारसंघात (Nanded Loksabha Constituency) एक धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेल्या एका तरुणाने EVM मशीनचीच कुऱ्हाडीने तोडफोड केली. तसेच केंद्रातील अधिकाऱ्यावर तरुणाने हल्ला केला. यामुळे मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला. तरूणाने फोडलेल्या मशीनमध्ये 500 मतदान झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर घडला. आज सकाळपासूनच केंद्रावर मतदान करण्यासाठी लोकांनी गर्दी जमवली होती. परंतु याचवेळी भानुदास एडके हा व्यक्ती मतदान केंद्रावर आला आणि त्याने VVPAT मशीन आणि बलेट मशीन कुऱ्हाडीने फोडून टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने केंद्रावर असलेल्या अधिकाऱ्यावरही हल्ला केला. यावेळी हा तरूण आपण संविधान वाचवण्यासाठी हे करत असल्याचे ओरडून सांगत होता. या सर्व प्रकारामुळे मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला.

पुढे मतदान केंद्रावर तैनाब असलेल्या पोलिसांनी ताबडतोब या तरुणाला ताब्यात घेतले. परंतु त्याने हे कृत्य नेमके कोणत्या कारणासाठी केले हे अजूनही समोर आलेले नाही. महत्वाचे म्हणजे, तरुणाने तोडफोड केलेल्या मशीनमध्ये अंदाजे पाचशे मतदान झाले होते. परंतु कंट्रोल युनिट सुरक्षित असल्यामुळे झालेले मतदान ही सुरक्षित राहिले असल्याचे माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच, ताब्यात घेतलेल्या तरुणांच्या डोक्यात निवडणुकीविषयी राग असल्यामुळे त्याने हे कृत्य केले असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.