औरंगाबाद | मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल,तर कायदा करावाच लागेल. कायदा करण्याचे काम हे संसदेच्या हातात आहे. यामूळे आता केंद्र सरकारने कायदा करीत समजाला आरक्षण द्यावेत. जर असे केले नाही तर, भाजपच्या खासदारांना समाज ठोकणार अशी संतप्त प्रतिक्रीया माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने रद्द केल्यानंतर गुरुवारी (ता.६) माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रसार माध्यमासमोर त्यांची भुमिका मांडली. हर्षवर्धन जाधव म्हणाले की, मराठा समाजासाठी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरक्षण जाहीर करून फेटे बांधून फटाके फोडले होते तेव्हाच जाणवलं होतं की टिकणारा आरक्षण नव्हते. यासाठी कायदा करावा असे मी वारंवार सांगत होतो. पण माझे कोणी ऐकलेच नाही.
केंद्रात भाजपचे ३०० हून अधिका खासदार आहेत. यामूळे आता भाजपच्या खासदारांनी मराठा आरक्षणासाठी कायदा करावा, ते करणार नसतील तर मराठा समाज त्यांना बघून घेईल. समाजासाठी भाजप कायदा करत नसेल, तर त्या खासदारांनी राजिनामा द्यावा, ‘आम्ही चकवा बहादूर आहोत, आम्ही कोणालाही चकवा देऊ शकतो असे चालणार नाही, असे जे खासदार करेल त्याला मराठा समाज ठोकणार असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले