हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवसात जर राज्यात अतिवृष्टी झाली तर यामुळे कापूस पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीक तज्ञांकडून कापूस पिकांची काळजी घेण्याबाबत काही महत्त्वाचे सल्ले देण्यात आले आहेत. याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.
सलग काही दिवस पाऊस पडल्यामुळे अनेकांच्या शेतात तण वाढले असून त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी शेतात वाढलेले तण काढून कीडनाशक आणि बुरशीनाशक फवारणी करणे सर्वात महत्त्वाचे आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे कापूस पिकाची वाढ थांबून ते पीक खराब होण्याची या काळात जास्त शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने शेतात साठून असलेले पाणी काढणे गरजेचे आहे. शेतात साचलेले पाणी कापूस पिकासाठी नुकसानकारक ठरू शकते.
जर तुम्ही शेतात नुकतेच कापूस पीक लावले असेल तर त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा तुडतुडे, फुलकिडे बसून पीक लवकर खराब होत जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीनं यावर मार्ग काढून उपाय करणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कीडनाशक आणि बुरशीनाशक असे फवारे मारावेत. जेणेकरून पिकांचे नुकसान होणार नाही. त्याचबरोबर, पिकाची लागवड देखील योग्यरीत्या होईल.
कापूस पिकांची काळजी घेण्यासाठी निळे, पिवळे, चिकट सापळे वापरणे गरजेचे आहे. यामुळे कीड नियंत्रण करणे सोपे जाईल. कापूस जर फुलांच्या आवश्यक असेल तर त्यासाठी कामगंध सापळे वापरणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे गुलाबी बोंड अळी नियंत्रण येण्यास मदत होते. मात्र तरी देखील कामगंध सापळे वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कापूस पिकांसाठी योग्य खत निवडणे देखील तितकेच गरजेचे आहे.
कापूस पिकांसाठी खत व्यवसस्थापन करताना एक बॅग, अर्धी बॅग युरिया, पाच किलो झिंक सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट, पाच किलो मॅगनेशियम सल्फेट याचा बेसल डोस सर्वात जास्त गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य खत व्यवस्थापन केल्यास कापूस पीक चांगले येते. अशा सर्व गोष्टींची जर तुम्ही काळजी राखली तर तुमचे कापूस पीक नक्कीच चांगले येईल.