सध्या पावसाची रिमझिम थांबली असून राज्यातल्या अनेक भागात थोडं थोडं ऊन पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही कुठे विकेंड ला मस्त फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर आम्ही आजच्या लेखात एक लय भारी डेस्टिनेशन तुम्हाला सांगणार आहोत. लोणावळा , माथेरान अशा हिल स्टेशन्सला तुम्ही नेहमीच जात असाल मात्र अहमदनगर जिल्ह्यातील हे हिल स्टेशन अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा खजिनाच आहे. चला जाणून घेउया या ठिकाणाबद्दल अधिक माहिती…
अहमदनगर हे महाराष्ट्रातलं एक अतिशय सुंदर आणि शानदार असं शहर आहे. अहमदनगर मधील हिल स्टेशन हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आम्ही बोलत आहोत अहमदनगर जवळ असलेल्या खंडाळा हिल स्टेशन बाबत. खंडाळा हिल स्टेशन हे त्याच्या अप्रतिम निसर्ग सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे.
पावसाळ्याच्या दिवसात तर हे ठिकाण म्हणजे स्वर्गाहून काही कमी नाही. कारण इथला नजारा हा बघण्यासारखा असतो. ढग जमिनीवर येतात. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या रिमझिम धारा आणि हिरवे गार झालेले डोंगर त्यातून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. या ठिकाणी हून प्रवाहित होणारे धबधबे अधिक प्रसिद्ध आहेत. या धबधब्याला भेटी देण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करतात
तुम्हाला जर रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक मोकळा श्वास घ्यायचा असेल, शहरातल्या कोंदट वातावरणातून शुद्ध हवा घ्यायची असेल तर खंडाळा हिल स्टेशन उत्तम ठिकाण ठरेल. हे ठिकाण अहमदनगर पासून 182.2 किलोमीटर अंतरावर आहे.