Expressway : देशभरात रस्त्याचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने नवनवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास राज्यातील दोन महत्वाची शहरं पुणे आणि मुंबई या शहरांना राज्यातील इतर शहरांशी जोडण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. सध्या या दोन्ही मोठ्या शहरांच्या दृष्टीने पुणे -मुंबई एक्सप्रेसवे आणि पुणे -बंगळुरू हायवे हे दोन्ही मार्ग अतिशय महत्वाचे आहेत. मात्र अनेकदा या दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई ते बंगळुरू नवा महामार्ग बांधण्याचा सरकारचा प्लॅन (Expressway) असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
पुणे बेंगलोर हायवेवर देखील तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो याच वाहतूक कोंडीतून आता नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. याच बाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान दिली आहे. मुंबई ते बेंगळूर या मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने नवीन हायवे बनवण्याचे ठरवलं असून त्याचा टेंडर हि निघाल्याची (Expressway) घोषणा गडकरी यांनी केली आहे.
कसा असेल नवा महामार्ग ?
नव्या महामार्गाबद्दल माहिती देताना गडकरींनी सांगितले की, अटल सेतू वरून उतरल्यानंतर तेथून थेट 14 लेन चा नवीन हायवे पुण्याच्या रिंग रोडला जोडण्यात येईल. मुंबई ते बंगळुरू द्रुतगती महामार्गाचे काम पुढच्या सहा महिन्यात करायचे ठरवले आहे. या प्रकल्पाचे टेंडर ही निघालं असून कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई- पुणे एक्सप्रेसवे ची 50% वाहतूक त्या रोडवरून जाईल. अटल सेतू वरून तुम्ही नव्या पुणे एक्सप्रेसला लागले तर तिथून पुण्याच्या रिंग रोडला येणार आणि तिथून थेट बंगळुरूला जाणार. पुढे हाच रोड पुणे औरंगाबादला जोडला (Expressway) जाणार त्यामुळे पुण्याच्या आत मध्ये अडकणार नाही असे गडकरींनी सांगितलं.
गडकरींनी सांगितला अनुभव (Expressway)
यावेळी बोलताना गडकरींनी आपल्या कुटुंबासोबत घडलेला वाहतूक कोंडीचा प्रसंगही सांगितला. ते म्हणाले की, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे जेव्हा आम्ही बांधला त्यावेळेस पुढचे 50 वर्ष आता काही समस्या नाही असं आम्ही म्हणायचो. मात्र ” आज माझा मुलगा आणि पत्नी पुण्याला येत होते नागपूरहून पुण्याला नीट पोहोचलो पण लोणावळ्यात एक तास अडकलो होतो.” असे ते म्हणाले. मात्र बरं झालं आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार आहे. असे ते म्हणाले.