Expressway In Maharashtra : महाराष्ट्रात बनणार 126 किमी लांबीचा नवा महामार्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Expressway In Maharashtra : राज्यात महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यापैकी शक्तीपीठ महामार्ग , समृद्धी महामार्ग यांचा समावेश होतो. आता महाराष्ट्रात 126 किमी लांबीचा आणखी एक नवा महामार्ग तयार होणार आहे. अलिबाग – विरार कॉरिडॉर असे मार्गाचे नाव असून यामुळे पाच तासांचे आंतर केवळ दीड तासात पूर्ण करता येणार आहे. यासाठी जवळपास 55 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून यामुळे अलिबाग ते विरार (Expressway In Maharashtra ) हा प्रवास खूपच कमी वेळेत होणार आहे.

कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी देशातील 14 नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते . विरार-अलिबाग कॉरिडॉरच्या निविदेची तांत्रिक बोली उघडण्यात आली आहे. कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील 11 पॅकेजेस तयार करण्यासाठी 14 कंपन्यांनी 33 निविदा सादर केल्या आहेत. 126 किमी लांबीचा हा कॉरिडॉर दोन टप्प्यात बांधला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 98 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात सुमारे 29 किलोमीटर (Expressway In Maharashtra ) लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे.

प्रकल्पात या जिल्ह्यांचा समावेश

हा कॉरिडॉर पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. एमएमआरचा महत्त्वाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी एमएसआरडीसीने भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पालघरमधील भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर रायगडमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

हुडकोकडून 22,250 कोटींचे कर्ज (Expressway In Maharashtra )

बहुचर्चित अलिबाग – विरार कॉरिडॉरच्या भूसंपादनाबाबतही २६ जूनला महत्त्वाचा निर्णय झाला. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22,250 कोटी रुपयांचे कर्ज हुडकोकडून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे.राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मागणीनुसार या कर्जासाठी महाराष्ट्र राज्य शासन हमी घेणार आहे. म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या कर्जास शासन हमी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 1,130 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.आतापर्यंत या प्रकल्पासाठी 215.80 हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 2,341 कोटी 71 लाख रुपयांचा निधी (Expressway In Maharashtra ) देण्यात आला आहे.

विरार-अलिबाग प्रकल्प तयार करून, एमएमआरमध्ये रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. त्यासाठी एमएमआरचे सध्या सुरू असलेले सर्व प्रकल्प एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत विरार अलिबाग कॉरिडॉर, अटल सेतू, शिवडी-वरळी कनेक्टर, वसई-भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंक आणि वांद्रे-वरळी सी लिंकसह अन्य प्रकल्प जोडले जाणार (Expressway In Maharashtra ) आहेत. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, MMR च्या प्रत्येक भागात जलद आणि सुलभ प्रवेश करणे शक्य होईल.