औरंगाबाद | आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारची सुट्टी, रविवारी 15 ऑगस्टची सुट्टी तर सोमवारी पारशी नव वर्षाची सुट्टी अशा प्रकारे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. यामुळे प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता शक्यता असल्याने एसटी महामंडळाने विविध मार्गांवर जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता सर्व आगार प्रमुखांनी विविध मार्गांवर जादा वाहतूक करण्याचे नियोजन सुरू केले आहे.
औरंगाबाद शहरातील औरंंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक आगार, सिडको आगारासह पैठण, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सोयगाव या सर्व आगार प्रमुखांनी आपापल्या विविध मार्गांवर तीन दिवस जादा वाहतूक करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. सलग सुट्ट्या, लग्नतिथी व इतर प्रवासी वाढ होण्याचे अंदाज पाहून त्यानूसार जादा वाहतूक करण्याचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे आता पुणे, जळगाव, भुसावळ, धुळे, नाशिक, जालना, अकोला, बीड, लातूर, नांदेड, नागपूर, परभणी आदी शहरांमध्ये एसटीच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.