Satara News : कडक उन्हात अन् थंडीच्या कडाक्यात सातारा जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी पडले ‘हिमकण’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अशात थंडी सोबतच उन्हाळी हंगामात महाबळेश्वरमध्ये ‘काश्मीरचाच जणू अनुभव घेत आहेत. या बदललेल्या वातावरणाने सोमवारी पहाटे वेण्णालेकसह परिसरात हिमकण पसरल्याचे पहायला मिळाले.

महाबळेश्वर शहरासह वेण्णालेक परिसर लिंगमळा व महाबळेश्वर तालुक्यात थंडी प्रमाण चांगले वाढले असून यासोबतच गार वारे वाहत आहेत. शालेय परीक्षा सुरू असल्यामुळे पर्यटकाची तुरळक गर्दी असते. परंतु शुक्रवार, शनिवार, रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात.

आज, सोमवारी पहाटे महाबळेश्वर बाजारपेठ परिसरांत 13.8 अंश तापमान होते. तर वेण्णालेक व लिंगमळा परिसरांत 9.2 अंश तापमान होते. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनी एन उन्हाळ्यात ‘काश्मीरचाच जणू अनुभव घेतला. बदललेल्या वातावरणाने पहाटे वेण्णालेकसह लगतच्या परिसरात दवबिंदू हिमकणात रूपांतरण झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. वेण्णालेक जेट्टीसह परिसरातील वाहनांच्या टपांवर मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झाले होते.