औरंगाबाद । मराठवाड्यातील खेळाडूंची पंढरी असलेल्या गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा देण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. तसेच स्थानिक खेळाडूंना प्रवेश शुल्कात सूट द्यावी, जिम्नॅस्टिकसाठी स्वतंत्र हॉल तयार करावा, अत्याधुनिक पद्धतीने क्रिकेटची सिमेंट पीच करा, अशी सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांची लवकरच भेट घेऊन याबाबत बैठक घेऊ, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खेळाडूंना सांगितले. या प्रशस्त क्रीडा संकुलात लष्करी, निमलष्करी व पोलीस दलातील भरतीतील प्रशिक्षणार्थी खेळाडूंसाठी विशेष साधन सुविधा उपलब्ध करून द्यावी. क्रीडा प्रकारातील खेळाडूंसाठीही सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खेळाडूंना दिली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी क्रीडा संकुलातील साधनसुविधा आणि इतर करावयाच्या साधन सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली.
विभागीय क्रीडा संकुलातील भारोत्तोलन, बास्केट बॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्केटिंग, व्यायाम शाळा, तलवार बाजी, स्क्वॅश, जिम्नॅस्टिक, मुष्टीयुद्ध, क्रिकेट आदी क्रीडा प्रकारांच्या सभागृहांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते रणजित पवार, रणजी क्रिकेटचे विनोद माने, नगरसेविका सीमा चक्रनारायण, कान्हूलाल चक्रनारायण आदींची उपस्थिती होती.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group