आता हेच सरकार आणि हेच मुख्यमंत्री राहणार!! आमदार अपात्र निकालावर फडणविसांची प्रतिक्रीया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला. यावेळी त्यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, असे स्पष्ट सांगितले. त्याचबरोबर त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कोणत्याही आमदाराला अपात्र केले नाही. यानंतर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले. तसेच, “विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन, त्यांनी कायदेशीर निकाल दिला, आता हेच सरकार आणि हेच मुख्यमंत्री राहणार” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “बुधवारी विधानसभाध्यक्ष दिलेला निकाल अतिशय कायदेशीर अशा प्रकारचा आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालची जी शिवसेना आहे तिलाच मूळ पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे, आणि त्याला वैध ठरवलेला आहे. त्यामुळे आता आमचं सरकार पहिल्या दिवशीपासून सांगत होतो हे पूर्ण मजबूत सरकार आहे. आता कोणाच्या मनात शंका असल्याचे कारण नाही, हेच सरकार राहणार आहे. हेच मुख्यमंत्री राहणार आहेत”

सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल

त्याचबरोबर, “आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही.मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. आमचा पूर्ण कार्यकाल आम्ही पूर्ण करणार आहोत. खरं म्हणजे माननीय अध्यक्षांनी अतिशय चांगलं विश्लेषण करून, सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न प्रेफ केले होते त्याच्यावर योग्य उत्तर देत आणि योग्य इन्फर्मेशन काढत हा घेतलेला निर्णय आहे”, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंची टीका

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर त्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच या निकाला विरोधात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नार्वेकर यांनी जो निकाल दिला आहे ते निर्देश पायदळी तुडवले. परंतु आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही, त्याने कोणालाही अपात्र केलेला आहे. महाराष्ट्रातल्या लहान मूल देखील सांगेल शिवसेना कोणाची आहे. मात्र आजचा निकाल देऊन त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे.