महाराष्ट्रात गुंडाराज सुरू, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) भाजपच्या (BJP) एका आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच आपले आहे. तर, दुसऱ्या बाजूला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच “पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा” अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे…

उल्हासनगरमध्ये घडलेल्या घटनेविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात गुंडाराज आहे. गँगवॉर रस्त्यावर आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. छत्रपती शाहु फुलेंच्या महाराष्ट्रात गॅगवॉर होत असेल तर दुर्दैवी आहे. हा प्रश्न मी संसदेत मांडणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची वेळ मागणार आहे. ही भाजपच्या सत्तेची आणि पैशाची मस्त आहे”

त्याचबरोबर, “महाराष्ट्र भरडला जातोय. वर्दीचा मान ठेवणारे आपण लोक आहोत. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही माहेर म्हणून जातो की पोलीस आम्हाला हकक मिळवून देतील. दिवसा ढवळ्या भांडणे होतात. आमदारांची हिम्मत कशी होते हे करण्याची? त्यांच्या पक्षाचा व्यक्ती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

एवढी यांना सत्तेची मस्ती?

पुढे बोलताना, “भाजपचा आमदार आहे म्हणून काहीही करेल का? मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवावा, याची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांसमोर हे होत असेल तर हे गुंडाराज आहे, एवढी यांना सत्तेची मस्ती? गुंडराज नाही तर काय? महाराष्ट्राची बदनामी गँगवॉर सरकारने केली आहे” असा सवाल सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना केला आहे.

दरम्यान, शुक्रवारी उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. सध्या जखमी महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विरोधकांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. तर मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.