राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेंदींनी केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्याचे राजकारण तापले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर मनसे, शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. हे प्रकरण ताजे असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जोरदार टीका केली. या राजकीय वादावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“एक गोष्ट स्पष्ट आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे, देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच राहणार आहेत. आमचे हिरोदेखील छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही. त्यामुळे मी असं मानतो की यावर काही वाद होण्याचं कारण नाही. मला वाटत नाही की राज्यपालांच्या मनातही काही शंका आहे.” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे.

तसेच “राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्याही मनात असा कुठलाही भाव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही असेदेखील देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) यावेळी स्पष्ट केले.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!