म्हणून हिंदुस्तान यूनिलिवर ‘फेअर अँड लव्हली’ क्रीमचं नाव बदलणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात करोडो महिलांना गोरं आणि सुंदर बनवण्याचा दावा करणारी फेअरनेस क्रीम, ‘फेअर अँड लव्हली’ (Fair & Lovely) आपलं नाव बदलणार आहे. कंपनीने या क्रीमच्या नावातून ‘फेअर’ हा शब्द हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या क्रीमवर वर्णभेदाचा आरोप केला जात आहे. अखेर अनेक आरोपांनंतर हे क्रीम बनवणारी कंपनी हिंदुस्तान यूनिलिवरने (Hindustan Unilever) क्रीमचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. आम्ही त्वचा सुंदर बनवण्यासाठी उत्पादन बनवत आहोत. कंपनीने निर्णय घेतला आहे की, या क्रीमच्या ब्रँडिंगमध्ये गोरेपणा या शब्दाचा वापर करणार नाही. त्याशिवाय कंपनीने आपल्या ब्रँडचा प्रचार करताना Fairness, Whitening आणि Lightening यांसारख्या शब्दांचाही वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाव बदलण्याचं हे आहे प्रमुख कारण
गेल्या काही वर्षांमध्ये सुंदरता आणि गोरेपणा या मुद्द्यावरुन कंपनीच्या या प्रोडक्टला मोठा विरोध होत आहे. अनेक महिला संघटनांनी या प्रोडक्टला विरोध करत, स्त्रीच्या सौंदर्याचं आकलन तिच्या रंगावरुन होऊ नये, असं म्हटलं आहे. या प्रोडक्टमध्ये, गोरेपणा हा शब्द ज्याप्रकारे वापरला जातो, त्यातून असं दिसतं की, केवळ गोरा रंग असलेल्या स्त्रियाचं सुंदर आहेत, असा आरोप संघटनांनी केला आहे.

1975 मध्ये लॉन्च करण्यात अली होती क्रीम
‘फेअर अँड लव्हली’ ब्रँड 1975 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. तेव्हापासून कंपनीने अनेक प्रसिद्ध मॉडेल्सला जाहिरातींमध्ये सावळा रंगा गोरा होताना दाखवण्यात आलं आहे. गोरा रंग हवा असल्यास या क्रीमचा वापर करा हेच या ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दाखवण्यात आलं आहे. देशात गोरेपणा क्रीमच्या बाजारात 50 ते 70 टक्के हिस्सा ‘फेअर अँड लव्हली’कडे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”