तेलंगणात 33 लाख रुपयांची चॉक पावडर असलेली बनावट औषधे जप्त; DCA ची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच तेलंगणाच्या ड्रग्ज कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशनने (DCA) बनावट औषधांप्रकरणी एक मोठी कारवाई केली आहे. DCA ने तब्बल 33.35 लाख रुपये किमतीची चॉक पावडर आणि स्टार्च असलेली बनावट औषधे जप्त केली आहेत. “मेग लाइफसायन्स” या अस्तित्वातच नसलेल्या कंपनीकडून ही बनावट औषधे मेडिकलमध्ये विकली जात होती. याची माहिती मिळतात DCA ने कारवाई करत 33.35 लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, मेग लाइफसायन्सेस या कंपनीकडून उत्पादित केली जाणारी सर्व औषधे DCA कडून “बनावट औषध सूचना आणि वापर थांबवा सूचना” च्या अधीन होती. त्यामुळेच DCA ने मेग लाइफसायन्सेस कंपनीच्या विरोधात ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गतच 33.35 लाख रुपयांची चॉक पावडर आणि स्टार्च असलेली बनावट औषधे जप्त करण्यात आली आहेत.

महत्वाचे म्हणजे, यापूर्वी उत्तराखंडमध्ये सिप्ला आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन सारख्या नामांकित औषध कंपन्यांच्या नावाने चॉक पावडर असलेली बनावट औषधे तयार करून विकल्या प्रकरणी एका औषध उत्पादन युनिटचा पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणात पाच जणांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बनावट औषधांप्रकरणी कर्नाटकमध्ये DCA ने मोठी कारवाई केली आहे.