‘गुगल’वर धोनी बद्दल सर्च करा पण जरा जपून!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । तुम्ही जर क्रिकेटप्रेमी असाल, किंवा क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जगभरात कोट्यावधी लोक महेंद्र सिंग धोनी उर्फ ‘माही’चे चाहते आहेत. आपला आवडता क्रिकेटपटू धोनी याच्या बद्दलची माहिती मिळवण्यासाठी ते गुगलवर की वर्ड सर्च करत असतात. धोनीची इंत्यभूत माहिती गुगलवर सर्च करून मिळवणं सोप्पं असलं तरी ते आता अनेकांना महागात पडू शकतं. गुगलवर धोनी सर्च करणे त्याच्या चाहत्यांना महागात पडू शकते, असा इशारा एका अहवालातून देण्यात आला आहे. एका अँटीव्हायरस बनविणाऱ्या कंपनीने यासंबंधी एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात याविषयीची माहिती दिली आहे.

गुगलवर धोनी नावाच्या हजारो बनावट लिंक्स तयार करण्यात आल्या आहेत. गुगलवर धोनी नाव सर्च केल्यास त्याचे चाहते बनावट लिंक्सवर क्लिक करू शकतात. या लिंक्स ओपन केल्यास हॅकर्स धोनीच्या चाहत्यांना मोठे नुकसान पोहचवू शकतात. यात बँकेची माहिती, आर्थिक नुकसान पोहोचवणे, किंवा डेटा चोरी करणे, मोबाइल हॅक करणे, कम्प्यूटर हॅक करणे, यासारखी माहिती ते हॅक करू शकतात. धोनीच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेण्याचे हॅकर्सने ठरवल्याचे या लिंक्समधून दिसत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. धोनीच्या चाहत्यांना फसवण्यात यावे यासाठी हॅकर्स गुगल सर्चची मदत घेत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. दरम्यान गुगलवर सेलिब्रिटीच्या नावानं सर्च करणं धोकादायक आहे. गुगलवर कीवर्ड टाकल्यास बनावट लिंक्स ओपन होतात. त्यामुळे मोबाइल किंवा कम्प्यूटर हॅक होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी याबाबत जागरुक असणे गरजेचे आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

Leave a Comment