वॉशिंग्टन डीसी | राहुल दळवी
विश्वासार्हता जपण्याचा व फेक न्यूजला आळा घालण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फेसबुक आपल्या वापरकर्त्यांना रेटिंग देण्याचा विचार करत आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, चुकीची माहिती पसरविली जाऊ नये यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. यापुढे अधिक वापरकर्त्यांनी एखादी पोस्ट चुकीची आहे हे लक्षात आणून दिल्यास त्याची सत्यता पडताळण्याची जबाबदारी फेसबुक करणार आहे.
रेटिंग प्रक्रियेअंतर्गत, वापरकर्त्यांनी शंका उपस्थित केलेला मजकूर पडताळून त्यांना आवश्यक असलेल्या अर्थाचा अधिक योग्य मजकूर पुन्हा देण्याची सोय फेसबुक करेल.
अधिकाधिक प्रमाणात अशी माहिती देणाऱ्या व्यक्तींचा फायदा फेसबुकला होणार असून त्यांची विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे.