Fake Weight Loss Medicines | वजन कमी करण्यासाठी बनावट औषधे विकणाऱ्या 250 वेबसाईट बंद; या संस्थेने केली कारवाई

0
1
Fake Weight Loss Medicines
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Fake Weight Loss Medicines आजकाल अनेकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढतच चाललेली आहे. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक अनेक औषढे घेतात. जेणेकरून ते सडपातळ होतील. परंतु आता सायबर सिक्युरिटी फॉर्म ब्रँड शीटने GPL – 1 प्रवर्गातील वजन कमी करणाऱ्या आणि मधुमेहावर बनावट औषधे विकणाऱ्या (Fake Weight Loss Medicines) 250 हून अधिक वेबसाईट बंद केलेल्या आहेत. ही माहिती कंपनीचे सीईओ योव केरेन यांनी दिलेली आहे

ब्रँड शीलने रॉयर्सला दिलेल्या या माहितीनुसार मागील वर्षी चयापचयावर उपचारांसाठी औषध विक्री करणाऱ्या 279 फार्मसी वेबसाईट (Fake Weight Loss Medicines) बंद केल्या होत्या. त्यापैकी 90% पेक्षा जास्त वेबसाईट या GPL – 1 या औषधाची संबंधित होत्या. याची माहिती कंपनीच्या सीईओ यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितले की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विकलेली ही 6900 पेक्षा अधिक बनावट औषधे आता बंद करण्यात आलेली आहेत. यामध्ये भारतातील 992, इंडोनेशियातील 544, चीनमधील 364 आणि ब्राझीलमधील 114 औषधांचा समावेश आहे.

अनेक देशांमध्ये या बनावट औषधांमुळे पेशंटवर अनेक घातक परिणाम झालेले आहेत. या औषध कंपन्या लोकांचा लठ्ठपणा कमी करण्याचा दावा करतात. परंतु या बदल्यात लोकांवर अनेक घातक परिणाम या औषधांमुळे झालेले आहेत. GPL – 1 हा एक अमिनो ऍसिडवर आधारित वेबसाईट संप्रेरक आहे. हा संप्रेरक एका विशिष्ट न्यूरोन्सच्या वतीने मेंदूला संदेश पाठवतो. त्यामुळे तुमची भूक नियंत्रणात येते.

Novo Nordisk चे Ozempic आणि Wegovy व Eli Lilly चे Mounjaro आणि Zepbound ही GLP-1 ही औषधं आहे. जी टाईप दोन मधुमेहासाठी वापरली गेली आहे. त्यामुळे भूक कमी लागते आणि पोट देखील हळूहळू रिकामे होते. ही औषधे घेतल्यास रुग्णाचे वजन (Fake Weight Loss Medicines) जवळपास 20% कमी करतात. या औषधांची मागणी दिवसेंदिवस जास्त वाढलेली आहे. त्यामुळे बनावट औषधांचा आता बाजार होत आहे. या औषधांचा परिणाम जरी सुरुवातीला होत असला, तरी देखील नंतर या औषधांचे मोठ्या प्रमाणात साईड इफेक्ट अनेक देशांमध्ये लोकांवर पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या बनावट औषधांवर बंदी घालण्यात आलेली आहे.