Family Insurance : फॅमिलीसाठी विमा खरेदी करताय? योग्य निवड करण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील फायदेशीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Family Insurance) आजकाल भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी गुंतवणूक करणे किती गरजेचे आहे? हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे अनेक लोकांचा गुंतवणुकीकडे कल वाढताना दिसतो आहे. अनेक लोक भविष्यातील आर्थिक सुरक्षेच्या हेतूसाठी आणि आपल्यासोबत आपल्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा काढतात. कारण स्वतःसाठी विमा न घेणे आपल्या कुटुंबासाठी अनपेक्षित काळी संकटमय परिस्थिती निर्माण करू शकते. आपल्या खांद्यांना कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी विमा आणखी मजबूत करते.

त्यामुळे भविष्यात आपल्या कुटुंबाची सुरक्षा लक्षात घेऊन विमा काढला जातो. पण अनेकदा योग्य विमा कसा निवडायचा? याबाबत लोकांमध्ये संभ्रम दिसून येतो. (Family Insurance) अशावेळी चूक झाली तर ज्या भविष्याची आर्थिक चिंता मिटावी म्हणून विमा काढला जातो त्याच भविष्याची चिंता वाढू शकते. म्हणून जर तुम्हीदेखील विमा काढायचा विचार करत असाल तर योग्य निवड करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊ.

विमा काढताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा (Family Insurance)

1. विमा निवडताना सगळ्यात आधी आपण विमा का घेतोय? आपला उद्देश काय हे नीट लक्षात घ्या आणि त्यानंतर विम्याची निवड करा.

2. ज्या इन्शुरन्स कंपनीतुन विमा घेताय तिची पूर्ण माहिती घ्या. त्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड आणि क्लेम सेटलमेंट रेशिओ एकदा जरूर तपासा.

3. आपण जो विमा घेतोय त्याचे कव्हरेज आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांसाठी पुरेसे आणि लाभदायी आहे का याची व्यवस्थित माहिती करून घ्या. (Family Insurance)

4. विमा घेताना आपल्याला त्याचे प्रिमियम भरायला जमतील अशीच निवड करा. अन्यथा अकाली पॉलिसी सरेंडर झाली तर तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

5. विमा निवडताना आपण इन्शुरन्स अॅडव्हायझरचा सल्ला घेतल्यास अधिक लाभ होईल. योग्य सल्ल्या मिळाल्यास योग्य विमा निवडणे सोपे जाईल.

6. शक्यतो कमी वयात विमा काढावा. जेणेकरून प्रिमियम कमी लागतो.

‘अशी’ करा योग्य विम्याची निवड

विमा काढताना आपण कायम कुटुंबाचा आधी विचार करतो. त्यामुळे आपण घेत असलेला विमा कुटुंबातील सदस्यांसाठी कसा लाभदायी ठरेल याची पूर्ण पडताळणी करणे गरजेचे असते. (Family Insurance) आता यात तुम्ही टर्म इन्शुरन्स पॉलिसी वा एंडोमेंट पॉलिसी घेऊ शकता. यातील मुख्य फरक असा की, टर्म इन्शुरन्स पॉलिसीत दिलेले प्रिमियम परत मिळत नाही, पण यात प्रिमियम कमी असतो. तर एंडोमेंट पॉलिसीमध्ये प्रिमियम बोनससहित परत मिळतो. फक्त यात प्रिमियम जास्त असतो. ही देखील महत्वाची गोष्ट आहे जी लक्षात घेऊन तुम्ही विम्याची निवड करू शकता.