Fan And Cooler | यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळा चालू झालेला आहे. अगदी घरात बसून देखील लोकांना थंड वारा मिळत नाही. एवढी उष्णता घरात वाढलेली आहे. दिवसा किंवा रात्रीचे बिना फॅन किंवा एसी , कुलरचा कुठलाही व्यक्ती घरात बसू शकत नाही. अनेकांना आजकाल एसीशिवाय शांत झोप देखील येत नाही. पंख्यामुळे खूप गरम हवा येते. त्यामुळे अनेक लोक एसी किंवा कुलरला प्राधान्य देतात परंतु अनेकांना हा एसी परवडत नाही. त्यामुळे लोक पंख्यातून गार वारा येण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. जेणेकरून त्यांना शांत झोप लागेल. परंतु उष्णता एवढी वाढलेली आहे की, कितीही उपाय केले, तरी कुलर आणि पंख्यातून गार वारा येत नाही. आज आपण या लेखामधून कुलर आणि पंख्यातून (Fan And Cooler) गार वारा येण्यासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत
कुलर आणि पंख्यातून गार वारा येण्यासाठी उपाय | Fan And Cooler
- उन्हाळ्यामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे फॅन किंवा कुलरचा पंखा फिरू लागला की, गार वारा बाहेर येत असतो. परंतु तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसी सारखा वारा पाहिजे असेल, तर तुम्ही टेबल फॅनमध्ये एक छोटीशी यंत्रणा बसवून त्यातून चांगले वारा येऊ शकता. यासाठी तुम्हाला अनेक ऑनलाईन व्हिडिओ देखील पाहता येतील.
- अनेक वेळा घरातील कुलर किंवा एसीचा कंडेन्सर बिघडतो. त्यावेळी घरात वारा येत नाही. त्यामुळे तुमच्या कुलर किंवा पंख्यामधून येणाऱ्या वाराचा वेग खूपच कमी असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला कंडेन्सर तपासून घेणे खूपच गरजेचे आहे. हे अगदी कमी किमतीमध्ये बाजारात उपलब्ध असतात.
- अनेक वेळा कुलर किंवा पंख्याच्या पातीवर धूळ आणि माती असलेली आहे. ती चिटकून राहिली की, त्यातून चांगला वारा येत नाही. तुम्ही जर महिन्यातून एकदा या पंख्याची स्वच्छता केली, तर तुम्हाला गार वारा मिळेल.
- अनेक लोक हे कुलर घराच्या आतल्या बाजूला ठेवतात. परंतु तुम्ही जर कुलर दरवाजा, बालकनी किंवा खिडकीमध्ये ठेवला, तर त्यातून गार वारा येईल. शिवाय आद्रता आणि चिकटपणा देखील जाणवणार नाही. आणि संपूर्ण रूममध्ये थंड वारा येईल.
- तुम्ही थंड वारा येण्यासाठी कुलरमध्ये बर्फाचे क्यूब देखील टाकू शकता. कुलरच्या गवतावर ते पाणी जाईल आणि आपल्याला चांगल्या वारा मिळू शकेल. तुम्ही हा उपाय दिवसा आणि रात्री देखील करू शकता.
- पंख्याचा वेग कमी झाला असेल, तर पंख्याच्या पाती पुसून घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही ओल्या फडक्याने ते पुसून घेऊ शकता. त्यातील धूळ आणि माती निघून गेली की फॅनचा वेग आपोआप वाढेल
- तुमच्या घरातला पंखा जर दिवस रात्र सुरू असेल, तर त्यातून वारा अगदी मंद स्वरूपात येतो. जास्त वेळ पंखा फिरत राहिल्यामुळे पंख्याची मोटर गरम होते. त्यामुळे दिवसभरात किंवा रात्री काही वेळासाठी पंखा बंद करावा. त्या नंतर पंख्याची मोटर थंड झाल्यानंतर संपूर्ण रूममध्ये थंड वारा येईल.