Farmasy Government Jobs |अनेक लोक हे बारावी सायन्स नंतर फार्मसीला ऍडमिशन घेतात. ही फार्मसी डिग्री पूर्ण झाल्यावर ते खाजगी क्षेत्रात काम करतात परंतु तुम्हाला माहित आहे का की फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांना आता सरकारी नोकरी देखील लागते. यात सरकारी नोकरीच्या अनेक संधी आहेत. जर तुम्हाला याबद्दल माहित नसेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण आम्ही तुम्हाला फार्मसी झाल्यानंतर कोणते सरकारी जॉब्स लागू शकतात याची सविस्तर माहिती देणार आहोत.
औषध निरीक्षक
औषध निरीक्षक याला ड्रग्स इन्स्पेक्टर असे देखील म्हणतात. फार्मसी पदवीधर झालेला कोणताही व्यक्तीने इन्स्पेक्टर म्हणून हे काम करू शकतो हे लोक फार्मसीटीकल उत्पादनांची गुणवत्ता तसेच त्यांचे परिणाम तपासतात त्याची पडताळणी करतात. त्याचप्रमाणे सर्व विक्रेते औषध कायद्यांचे पालन करत आहेत की नाही याची देखील ते पडताळणी करतात. लोकसेवा आयोगाने कर्मचारी निवड आयोग एसएससी मोठ्या प्रमाणावर औषध निरीक्षकांची भरती करतात. त्यामुळे जर तुमची फार्मसी झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि तुम्ही सरकारी नोकरी मिळू शकता.
शासकीय रुग्णालयातील फार्मासिस्ट
शासकीय रुग्णालयात देखील फार्मसी नोकरी असते. यासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता. हे औषध विक्रेते औषध वितरित करण्यासाठी रुग्णांना त्यांच्या वापराबद्दल माहिती देत असतात. हे लोक सरकारी रुग्णालयातील आरोग्यसेवा टीमसोबत सातत्याने काम करत असतात. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधांची योग्य साठवणूक केलेली आहे की नाही याची चौकशी करतात. दरवर्षी विविध सरकारी रुग्णालयांमध्ये फार्मसीस्टच्या नोकऱ्यांची (Farmasy Government Jobs) जाहिरात येते. यावेळी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यामध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागते त्याचप्रमाणे मुलाखत देखील द्यावी लागते.
संशोधन अधिकारी | Farmasy Government Jobs
संशोधन अधिकाऱ्याला रिसर्च ऑफिसर असे देखील म्हटले जाते. भारत सरकारच्या प्रयोगशाळांमध्ये देखील संशोधन अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. आरोग्य उपक्रमांमध्ये यांची मोठी मदत होते. हे संशोधन अधिकारी औषध शोध आणि त्याच्या कामांमध्ये काम करत असतात. या अधिकाऱ्यांची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद त्याचप्रमाणे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद या ठिकाणी नियुक्ती केली जाते.
दक्षता अधिकारी
पदवी घेतल्यानंतर उमेदवार हे फार्मोकोव्हिजिलन्स अधिकारी म्हणून देखील नोकरी मिळू शकतात. या अधिकाऱ्याचे काम हे विविध उत्पादकांच्या सुरक्षेतेचे परीक्षण आणि मूल्यांकन करणे हे असते. औषधांच्या प्रतिक्रिया गोळ्या करणे त्याचप्रमाणे विश्लेषण अहवाल तयार करणे हे महत्त्वाचे काम त्यांना करावे लागते. भारतात केंद्रीय आणि विश्लेषण अहवाल तयार करणे भारतात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था राष्ट्रीय, औषध निर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था, राज्य औषध नियंत्रण विभाग आणि आयसीएमआर यांसारख्या ठिकाणी या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. ( Farmasy Government Jobs)
सरकारी शिक्षक
तुमचे जर फार्मसी शिक्षण पूर्ण झाले असेल. तर तुम्ही सरकारी महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करू शकता. हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असेल सरकारी फार्मसीची महाविद्यालय या शिक्षकांची भरती करत असतात. यामध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना राष्ट्रीय पात्रता परीक्षा आणि राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.