पपई शेतीतून 2 एकरात तब्बल 22 लाखाचं उत्पन्न; शेतकरी बंधूंचा यशस्वी प्रयोग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक शेतकरी शेतीमध्ये उत्तम दर्जाची पिके घेत आहेत. शेतीत वेगवेगळे प्रयोग करून त्यातून उत्पन्न घेत आहेत. असाच एक प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कन्हेर गावच्या दोन शेतकरी बंधूंनी केला असून त्यातून त्यांना चांगली कमाई होऊ लागली आहे. त्यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात पपई शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. दोन एकरवर सेंद्रिय पद्धतीन पपईचे उत्पादन घेतले आहे. यातून आत्तापर्यंत दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. किलोला 25 रुपयांचा दर मिळत आहे. शेवटपर्यंत असाच दर मिळाला तर 21 ते 22 लाखाचं उत्पन्न मिळणार आहे.

पपईच्या शेतीने पालटलं जीवन

माळशिरस तालुक्यातील बाळासाहेब सरगर आणि रामदास सरगर हे दोघे शेतकरी. यांच्यातील बाळासाहेब सरगर यांना दुष्काळी माळरान असूनही आपल्या शेतात पपई लागवड करण्याची कल्पना सुचली. सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या दुष्काळी पट्टातील कन्हेर गावात पाण्याची टंचाईचा जाणवत असे. त्यांनी अगोदर पाण्याची समस्या दूर केली. मग त्यांनी आपल्या पावणे दोन एकर शेतीमध्ये आठ महिन्यापूर्वी पपईची लागवड केली. 2 हजार 100 रोपांमधून त्यांची संपूर्ण पपईची बाग फुलली आहे. या शेतीतून त्यांचे जीवनमान पालटलं आहे.

शेतकरी मित्रांनो आज शेती करत असताना आपल्यासामोर अनेक संकटे येतील. अशावेळी आपण शेतीमध्ये अनेक प्रयोगशील पिके घेऊन त्यातून चांगले उत्तम मिळवू शकतो. तुम्हालाही रेपपई शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर काळजी करू नका. हॅलो कृषी हे ॲप मोबाईलमध्ये आजच install करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रकारचे शेतीशी निगडित अशा पूरक व्यवसायाची माहिती घेऊ शकता. याशिवाय अनेक योजनांची माहितीही मिळवू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा. App ओपन होताच तुम्हाला शेतीही निगडी अशा व्यवसायाची माहिती दिसेल. Hello Krushi मध्ये तुम्हाला बाजारभाव, शेतजमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज यांसारख्या अनेक सुविधा सुद्धा पहायला मिळतील.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here

जिराईत शेतीला आलं बागायती स्वरूप

दुष्काळी सारख्या पट्ट्यात असलेल्या कन्हेर गावात पपई शेती करणे अवघडच होते. कारण या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असल्याने पिकाच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होता. अशा स्वरूपात त्यांनी पपईची लागवड केली. त्यांनी लावलेल्या एका झाडाला अंदाजे 80 ते 100 फळे लागली. दुष्काळी पट्ट्यातील जिराईत शेतीला आता बागायतीचे स्वरुप आले आहे. संपुर्णपणे शेणखताचा वापर करुन पपईची बाग त्यांनी फुलवली आहे.

Papai
Papai

देशभरातील व्यापारी देतायत पपईच्या शेतीला भेट

कन्हेर गावात पपईची उत्तम प्रकारे शेती करणाऱ्या सरगर बंधूंची आता बाहेरील देशातही ओळख झाली आहे. साधारणपणे आठ महिन्यात या पपईच्या शेतीला अडीच लाख रुपयापर्यंतचा खर्च झाला आहे. यातून सुमारे 21 ते 22 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत असल्याचे ते म्हणतात. या पपईला सध्या बाजारात किलोला 25 रुपयांचा भाव मिळत आहे. सध्या सरगर बंधूंची पपई ही चेन्नई आणि कोलकाता या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे. या ठिकाणाहून पपईला मोठी मागणी आहे. सध्या देशभरातील व्यापारी सरगर बंधूंच्या शिवारात येऊन पपई घेऊन जात आहेत.

पपई शेतीत ड्रीप आणि कमी पाण्याचा प्रयोग

पपई शेतीत केला ड्रीप आणि कमी पाण्याचा प्रयोग

सरगर बंधूनी पपई शेती करताना पाण्याचेही योग्य प्रकारे व्यवस्थापन केले आहे. त्यांनी ड्रीप आणि कमी पाण्यावर सेंद्रिय पद्धतीनं पपई पिकाचा प्रयोग केला आहे. जागेवर आम्हाला पपईला किलोला 25 रुपयांचा दर मिळत आहे.

पपई लागवडीसाठी योग्य माती

पपई लागवडीसाठी योग्य माती

हे झाड हलक्या चिकणमाती किंवा चिकणमाती जमिनीत चांगले वाढते. चांगल्या लागवडीसाठी मातीचे पीएच मूल्य 5.5 ते 6.5 असावे. पपईला जास्त पाणी जमत नाही हे आपल्याला माहित आहे. म्हणूनच गुळगुळीत किंवा पाणी साचलेली माती त्याच्या लागवडीसाठी अजिबात योग्य मानली जात नाही. पण लाल, पिवळ्या आणि काळ्या मातीत ते सहज पिकवता येते.

papai

तरुणांसाठी रोजगाराची उत्तम संधी

दोन हेक्टरमध्ये पपईची लागवड केल्यास वर्षाला जवळपास 22 लाखांपर्यंत नफा मिळू शकतो. ठोक भावात प्रतिकिलो 15 रुपयांच्या भावाने पपईची विक्री केल्यास प्रतिक्विंटल 1500 रुपये मिळू शकतात. अशाप्रकारे यातून 25.5 लाखांचा नफा होऊ शकतो. या शेतीत 3 ते सोड तीन लाखांपर्यंत खर्च येतो. खर्च वगळता वर्षाला एका हंगामात 22 लाखांपर्यंत नफा कमावता येतो. पपईच्या माध्यमातून तरुणांनाही एकप्रकारे रोजगाराची उत्तम संधी प्राप्त होते.

पपईचं फळ

पपईचं फळ कधी तयार होतं?

पपईचं झाडावर 10 ते 12 महिन्यांमध्ये फळ तयार होते. हिरवी पपई तोडल्यानंतर काही दिवसांतच पिकून ते फळ पिवळं होतं. पपई तोडताना फळाला डाग किंवा काही खड्डे पडू नयेत याची काळजी घ्यावी लागते. एका पपईच्या झाडापासून जवळपास 30 ते 35 किलो पपई मिळते. प्रतिहेक्टरमागे 15 ते 20 टन पपई मिळू शकते. यातून जवळपास 22 लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो.

पपईच्या संकरित जाती

पपईच्या संकरित जाती

1) पुसा तीनी : हा प्रकार 1983 साली विकसित करण्यात आला. त्याच्या एका वनस्पतीतून 25 ते 30 किलो पपईचे फळ मिळते. त्याची फळे आकाराने मध्यम आणि लहान असतात. वनस्पतींची उंची 120 सेंमी.च्या जवळपास आहे. वनस्पतींची उंची जमिनीच्या पृष्ठभागापासून 30 सेंमी वर असताना त्यांना फळ मिळू लागते.

2) पुसा जायंट : 1981 साली विकसित करण्यात आला. त्याची फळे आकाराने मोठी असतात. भाज्या आणि पेटा बनवण्यासाठी ही योग्य प्रजाती आहे. वनस्पती 30 –35 किलो फळांचे उत्पादन करते. या प्रजातीच्या वनस्पती 92 सेंटीमीटर झाल्यावर फळ देतात.

3) पुसा डेलिसियास : 1986 साली विकसित करण्यात आला. एका वनस्पतीमध्ये 40 ते 45 किलो पपई तयार होते. स्वादिष्ट फळे असलेल्या वनस्पतींची उंची 216 सेंमी असते. वनस्पतींची उंची 80 सेंमी असताना वनस्पतींची पडतात.

4) सुर्या : हा एक प्रमुख संकरित प्रकार आहे. त्यातील एका फळाचे वजन 500 ते 700 ग्रॅम आहे. 55 –56 किलो फळांचे उत्पादन प्रति वनस्पतीस होते.

5) रेड लेडी 786 : हायब्रिड प्रकारांमध्ये त्याचा समावेश होतो. या वाणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच वनस्पतीमध्ये नर आणि मादीची फुले असतात. यामुळे प्रत्येक वनस्पतीतून फळांचे उत्पादन होते. लागवडीनंतर केवळ 9 महिन्यांनी वनस्पतींना फळे दिसू लागतात. या प्रकारच्या फळांची साठवण क्षमता इतर जातींपेक्षा जास्त आहे. या प्रजातीची संपूर्ण भारतात यशस्वी लागवड केली जात आहे. नो युवर सीड्स नावाच्या कंपनीद्वारे या प्रजातीचे जगभरात वितरण केले जात आहे.

6) को 2 : या प्रकारच्या पपईची लागवड भारतातही यशस्वीपणे करता येते. त्यातील एका फळाचे वजन सुमारे 1.25 ते 1.5 किलोग्रॅम असते. एका वनस्पतीतून दरवर्षी 80 ते 90 फळे मिळतात. फळांमध्ये अर्क जास्त असते.

7) को 7 : हे वाण 1997 साली विकसित करण्यात आले. लाल रंगाच्या पल्प फळांचा आकार लांब आणि अंडाकृती असतो. प्रत्येक वनस्पतीमागे सुमारे 100 ते 110 फळे तयार होतात. दक्षिण भारतात विकसित झालेल्या या प्रजातींसह बिहारच्या कृषी-हवामानात चांगली कामगिरी होत नाही.